रात्री सिक्युरिटीची नोकरी, दिवसा अभ्यास… मोठ्या जिद्दीनं मारली बाजी; म्हसवडच्या RJ केराबाईंचा नातू PSI अमोल घुटुकडे यांची संघर्षगाथा

रात्री सिक्युरिटीची नोकरी, दिवसा अभ्यास… मोठ्या जिद्दीनं मारली बाजी; म्हसवडच्या RJ केराबाईंचा नातू PSI अमोल घुटुकडे यांची संघर्षगाथा


जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण काही लोकांच्या जीवनात हा संघर्ष अगदी जन्मतःच सुरु होता. पण त्या संघर्षाला न जुमानता  त्याच्याशी दोन हात करत एका व्यक्तीने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून राज्यातून PSI परिक्षेत आलेले अमोल घुटुकडे. PSI अमोल घुटुकडे यांना या संघर्षाचा जणू वारसाच आपल्या आजीकडून लाभला आहे. ती आजी म्हणजे माण गावची म्हसवड येथील RJ केराबाई सरगर. 

PSI अमोल घुटुकडे यांचं कुटुंब अतिशय दु्र्गम भाग असलेल्या माण मधील म्हसवड गावातील. या कुटुंबाच उपजिवेकच साधन म्हणजे शेती आणि मेंढपाळ हा दुय्यम व्यवसाय. दुष्काळानंतर सर्वच गोष्टी कठीण झाल्या होत्या. 

शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते हे लक्षात आलं होतं. यामुळे दहावी नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आलो. पण पुण्याच वातावरण जमलं नाही आणि पहिल्याच वर्षी म्हणजे अकरावीला नापास झालो, असं अमोल सांगतात. 

इंजिनिअरिंगच शिक्षण घेतल्यानंतर नेटवर्किंग कंपनीत दीड वर्ष काम केलं. पण चार भिंतीत मन रमत नव्हतं. म्हणून २०२१ मध्ये पुन्हा गावाकडे जाऊन PSI ची तयारी केली.आणि २०२३ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त झालं, असं PSI अमोल सांगतात. 

अमोल आता नाशिकमध्ये आपलं ट्रेनिंग सुरु आहे. अमोल सांगतात की, या सगळ्या प्रवासात मला खरी प्रेरणा मिळाली ती माझी आजी केराबाई यांच्याकडून. 

RJ केराबाई या माझ्या आईच्या आई. आजपर्यंतचा तिचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आम्ही नातवंड कधी कधी परिस्थितीसमोर हतबल होतो. पण आमची आजी आजही परिस्थितीसमोर खंबीर उभी आहे. आज तिच्या कलेने तिला वेगळी म्हणजे RJ म्हणून ओळख मिळवून देते, असं अमोल सांगतात. 

आजही मला तो दिवस आठवतोय जेव्हा माझ्याकडे PSI च्या परिक्षेसाठी शूज नव्हते. तेव्हा ही परिस्थितीसमोर हात टेकले पण आजीनेच माझ्या हातात १० हजार दिले आणि शूज घ्यायला सांगितले. आजी आजही आम्हाला प्रेरणा देतेय, असं PSI अमोल घुटुकडे सांगतात. 

आर जे केराबाई सध्या मुंबईतील नरे पार्क येथे सुरु असलेल्या माणदेशी महोत्सवात उपस्थित आहे. केराबाई यांना तुम्हाला सहज भेटता येणार आहे. हा महोत्सव रविवारी ९ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. 





Source link

घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?

घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?


Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय. कृषी खात्यानं खरेदी केलेल्या वस्तू अंजली दमानिया यांनी ऑनलाईन खरेदी केल्यात आणि त्या वस्तूंच्या किंमती कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीच्या अनेक पटीनं कमी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तत्कालीन कृषीमंत्र्यांनी वस्तू खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केलाय.

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषीविभागात 160 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार अंजली दमानिया यांनी केलाय. बाजारभावातील किंमतीपेक्षा अनेक पटीनं वाढीव किंमत देऊन नॅनो युरिया, नॅनो डीपीएची खत खरेदी करण्यात आल्याचं अंजली दमानिया यांनी आरोप केला होता. मात्र अंजली दमानिया यांचे आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले होते.

मात्र आता धनंजय मुंडे यांचा दावा खोटा असल्याचं पुराव्यासह अंजली दमानिया यांनी दाखवून दिलंय. त्यासाठी अंजली दमानिया यांनी एका वेबसाईटवरून नॅनो युरिया, नॅनो डीएपी खरेदी केलीय. त्यात दोन्ही खतांची खरेदी किंमत कृषी विभागानं खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा खूप कमी असल्याचं समोर आलंय.

कृषी मंत्र्यांनी खरेदी केलेला कृषी माल

1. नॅनो युरिया : 220 किंमतीच्या 19,68,408 बॉटल विकत घेतल्या
2. नॅनो डिएपी : 590 रुपयाने 19,57,438 बॉटल विकत घेतल्या.
3. बॅटरी स्प्रे : 3426 रुपयाने 2,36,427 स्प्रे विकत घेतले.
4. मेटाल्डिहाईड  1275 रुपयांनी  1,96,000 किलो विकत घेतलं.
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 1250 रुपयांनी 6 लाख 18 हजार बॅग घेतल्या

अंजली दमानियांच्या दाव्यानुसार क्रुषी मालाची किंमत

1. नॅनो युरिया : 92 रुपये
2. नॅनो DAP : 261 (500 ML) रुपये
3. बॅटरी स्प्रे : 2450 ते 2946 रुपये
4. मेटाल्डिहाईड : 817 रुपये
5. कापूस गोळा करण्याच्या बॅग : 20 बॅग 577 रुपये

कृषी खात्यानं वाढीव दरानं शेतकऱ्यांसाठी खतं खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केला असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

नॅनो युरिआ, नॅनो डीएपीसह इतर 5 वस्तुंची खरेदी 60 ते 70 टक्के वाढीव दरानं करून धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केला आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केलीय.





Source link

दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम

दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय, थेट साईभक्तांवर होणार परिणाम


पुढील
बातमी

देशमुख हत्या प्रकरणाच्या बातम्या पाहतो म्हणून तरुणाला मारहाण; हल्लेखोर कृष्णा आंधळेचे मित्र





Source link

पुण्यात आहे महाराष्ट्रातील विचित्र मंदिर; इथं अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते

पुण्यात आहे महाराष्ट्रातील विचित्र मंदिर; इथं अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते


पुढील
बातमी

पुण्यातील ‘बुधवार पेठ’चे जुने नाव माहित आहे का? नावाचा थेट औरंगजेबशी संबध





Source link

School Bus चा प्रवास 18 टक्क्यांनी महागला; पालकांच्या खिशाला कात्री

School Bus चा प्रवास 18 टक्क्यांनी महागला; पालकांच्या खिशाला कात्री



School Bus Fees: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण आता शालेय बस प्रवास देखील महागणार आहे



Source link

पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया, पण जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले

पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया, पण जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले



बुलढाण्यातील पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकीत करणारं होतं. पाहुयात नेमकं काय झालंय.
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp