by Hansraj Agrawal | Feb 28, 2025 | Trending News
Pune Swargate Rape Case Accuse Arrested: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या ‘शिवशाही’ बसमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील एका गावातून पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रात्री एकच्या सुमारास आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गावकरी आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केलीय. तब्बल 75 तासांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असताना
आरोपी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गुनाट गावच्या शिवारातूनच अटक करण्यात आली आहे. आरोपी एका शेतातील कॅनलच्या बाजूला झोपला असताना त्याला पकडण्यात आले. पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे याला लष्कर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. आज दुपारी 3 वाजता त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.
अत्याचार केल्यानंतर मूळ गावी परतला
मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात परतला होता. संध्याकाळी पाचपर्यंत तो घरीच थांबला होता. आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात सकाळी 11 वाजता पोहचला होता. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याने घरी विश्रांती घेऊन तो गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपी शिरुरमध्येच शेतात लपला असल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
ऑन रेकॉर्ड आरोपी
स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे पोलीस तपासादरम्यान समोर आले आहेत. काही राजकीय आणि पोलिसांच्या ही तो संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसटी स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
घरच्यांचीही चौकशी
दत्तात्रय गाडेवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेवर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. 2021 मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकीने तो पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं आहे. दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी आई-वडील, पत्नी, 2 मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुणे पोलिसांनी स्वारगेट प्रकरणात दत्तात्रय गाडेचा भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 27, 2025 | Trending News
Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps
Crowe-Thorpe Trophy, 2024
Nov 28, 2024 | 1st Test – Day Stumps
Sri Lanka in South Africa, 2 Test Series, 2024
No match is being played.
Nov 22, 2024 | 1st Test
Bangladesh in West Indies, 2 Test Series, 2024
|
WI
(144.1 ov) 450/9 dec
(46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov)
132 (38.0 ov)
|
|
West Indies beat Bangladesh by 201 runs
|
| Full Scorecard → |
Nov 26, 2024 | 2nd ODI
Pakistan in Zimbabwe, 3 ODI Series, 2024
|
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets
|
| Full Scorecard → |
Source link
by Hansraj Agrawal | Feb 26, 2025 | Trending News
नाशिकच्या कुंभमेळ्यावरुन महायुतीत कोल्ड वॉर सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आज फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी होती. तर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजनांनी देखील दांडी मारली होती.
– नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक
– बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवारांची गैरहजेरी
– दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. दरम्यान या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली होती. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी कुंभमेळासंदर्भात नाशकात घेतलेल्या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित नव्हते.
कुंभमेळ्यावरुन महायुतीत कोल्ड वॉर?
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती. या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते.
तर 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजन गैरहजर होते
भाजपच्यी बैठकीची तयारी करायची होती त्यामुळे गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी त्यावेळी दिलं होतं…
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली.. त्यावर एक नजर टाकुयात…
महाकुंभबाबत बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे –
– गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन
– प्रयागराज महाकुंभला भेट देऊन आलेल्या अधिकाऱ्याकडून व्यवस्थेचे सादरीकरण
– नियोजन आणि समन्वयासाठी प्रशासन कुंभ प्राधिकरण स्थापन करणार
– कुंभमेळाबाबतचे विधेयक अधिवेशनात मांडलं जाणार
– AI चा अधिकाधिक वापर करावा, तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप द्यावं
– संपूर्ण नियोजनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी सौजन्य पाळावे
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे. दरम्यान या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविकांची नाशकात मोठी गर्दी होणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 26, 2025 | Trending News
Pune News Today: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2025 | Trending News
Kalyan Police Station Firing: कल्याण पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून गेला होता.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 25, 2025 | Trending News
Chhaava Movie Controversy: ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वाददेखील उफाळून आले आहे. छ्त्रपती संभाजी महाराज यांना औंरगजेबाने कैद करुन अत्यंत निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली. गणोजी आणि कान्होजी यांनी फितुरी केल्यामुळं संभाजी राजे औंरगजेबाच्या हाती लागले, असं चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मात्र, चित्रपटातील याच दृश्यावरुन वाद निर्माण झाले आहेत. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा घेतला निर्णय त्यांनी घेतला आहे.
छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात शिर्के घराणे आक्रमक झाले आहेत. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात सर्व कुटुंबीयांतील सदस्यांनी एकत्र येत गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. मंदिरात शिरकाई देवीची आरती आणि पूजा करत छावा चित्रपटाचा दिग्दर्शकांच्या विरोधातील रस्त्यावरील आणि न्यायालीयन लढाईला सुरुवात करत असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा उभा राहतोय, शिर्के घराण एकत्र येतंय, त्यामुळं वातावरण तापण्याआधीच लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटातील वादग्रस्त भाग तात्काळ वगळवा, अशी मागणी शिर्के कुटुंबीयांनी केली आहे. आम्ही छत्रपती यांचे मावळे आहोत, गनिमीकाव्याने लढा लढणार, लढा कसा असणार हे आत्ता सांगणार नाही, त्यांना वेळोवेळी तो कळेल आणि त्यांना तो सहन होणारं नाही, असा इशारा यावेळी शिर्के कुटुंबियांतर्फे देण्यात आला आहे.
शिर्के कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, छावा चित्रपट हा शिवाजी सावंत यांच्या छावा कांदबरीवर आधारित आहे. कांदबरीत गणोजी शिर्के, कानोजी शिर्के, शिरकाण गावचे त्यांचे कुलदैवत या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. पण या चित्रपटात मी त्यांचं नावही घेतलं नाहीये. गावही दाखवलेले नाहीये. गणोजी आणि कान्होजी या एकेरी नावाने चित्रपटात उल्लेख केला आहे, असं लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार, लक्ष्मण उतेकर यांनी भूषण शिर्के यांच्याशी संपर्क केला आणि अजाणतेपणी कुटुंबाच्या भावनांना ठेच पोहोचली असेल तर मी माफी मागतो, असंही लक्ष्मण उतेकर यांनी म्हटलं आहे.
Source link