by Hansraj Agrawal | Feb 21, 2025 | Trending News
Buldhana Rapid Hair Loss: बुलढाणा जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये लोकांना टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचे मूळ पंजाब, हरयाणा राज्यातील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी काढला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यासाठीचे उपायही त्यांनी शोधले आहेत.
झी २४ तासशी बोलताना ते म्हणाले, बुलढाण्यात त्या गावातील सगळे गावकरी रेशनच्या दुकानावर अवलंबून आहेत. रेशनमध्ये मिळणारा गहू त्यांचे या आजाराचे कारण ठरला. त्यामुळे बोंदगावचे सरपंच रामेश्वर धारक यांच्याकडून तिथे येणाऱ्या गव्हाच्या पोत्यांचे फोटो, गव्हांचे सॅम्पल मागवून घेतले होते. ते गहू पंजाब, हरयाणामधील शिवालिक पर्वतरांगांच्या पायथ्याशी असणाऱ्या भागातील होते हे सिद्ध झाले. शिवालिक पर्वतरांगांतून पावसाळ्यात मोठे झरे येतात. तिथल्या दगडांमध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त आहे. झऱ्यांच्या पाण्यासोबत ते शेतीत पसरते. त्या भागात तिथल्या शेतकऱ्यांनी तशा जमिनीला कुंपण घातले आहे. इथे पीक घेऊ नका, असेही सांगितले आहे. गव्हामध्ये सेलेनियम शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. त्या भागात पिकलेले गहू रेशन दुकानांच्या माध्यमातून बुलढाणा भागात आले. हे त्या पोत्यांवर छापलेल्या माहितीवरून सिद्ध झाल्याचे डॉ. बावस्कर म्हणाले.
कायमस्वरूपी उपाय आवश्यक
जर जमिनीत सेलेनियमचे प्रमाण वाढलेले असेल तर ती जमीन नापीक करणे किंवा त्या जमिनीची विक्री करणे हा उपाय असू शकत नाही. अशा जमिनी सेलेनियममुक्त करण्यासाठी जमिनीत शेणखत आणि जिप्सम टाकायला हवे. त्यासोबतच सूर्यफूल आणि तीळ हे आंतरपीक घेतले पाहिजे. तिळामध्ये सेलेनियम शोषून घेण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचाही फायदा होऊ शकतो. या भागात सरफेस वॉटर देण्याच्या दृष्टीने कालव्यातून पाणी द्यावे लागेल, हे उपाय कायमस्वरूपी करावे लागतील, असेही डॉ. बावस्कर यांचे म्हणणे आहे.
‘…तर त्या १८ गावांमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही घडू शकते’
सरकारने देखील पंजाब, हरयाणाच्या भागातून येणाऱ्या गावात सेलेनियमचे प्रमाण किती आहे हे गहू वितरण करण्याआधीच तपासावे, तसे न तपासता जर गव्हाचे वाटप, वितरण झाले तर जे बुलढाण्यात घडले ते महाराष्ट्रात कुठेही घडू शकते, अशी भीतीही डॉ. बावस्कर यांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्यात जे काही घडले त्याचा आयसीएमआरकडून लवकरच रिपोर्ट येणार आहे, असे सांगितले जात होते. मात्र, अद्यापही आयसीएमआरने यासंबंधी कसलाही खुलासा किंवा रिपोर्ट दिलेला नाही. तो दिला तर या प्रकरणावर आणखी प्रकाश पडू शकतो. आयसीएमआरसारखी संस्था या विषयात अजूनही गप्प बसत असेल तर अशा भागातील लोकांनी कोणाकडे बघायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 20, 2025 | Trending News
Cats Sterilization: नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये
Source link
by Hansraj Agrawal | Feb 20, 2025 | Trending News
पुढील
बातमी
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात…
Source link
by Hansraj Agrawal | Feb 19, 2025 | Trending News
राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण म्हणजे डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र आयत्या वेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यात पुन्हा एकदा डान्सबारची छमछम सुरू होण्याची शक्यता आहे. डान्सबार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येणार होता. मात्र, आयत्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसुद्यात सुधारणा करून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना केल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टानं डान्स बारसंदर्भात अलीकडेच काही निर्देश दिले आहेत. त्या आड डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्याला रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.
मात्र कॅबिनेटचा निर्णय लीक झाल्यामुळेच हा प्रस्ताव मांडता आला नाही असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित आर आर पाटील आक्रमक झाले आहेत. डान्सबार पुन्हा सुरू केले तर मैदानात उतरू, असा इशारा रोहित आर आर पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने 2016 साली डान्सबारसंदर्भात एक कायदा केला होता. डान्स बारसंदर्भात नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन डान्स इन हॉटेल्स, रेस्तराँ अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमन अॅक्ट 2016 हा नवा कायदा केला होता. या कायद्यात आता काही नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत.
नव्या तरतुदी काय?
– डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
– डिस्को आणि ऑर्केस्ट्रा संदर्भात राज्य सरकारच्या परवानगी संदर्भात ही बदल करणार
– डान्सबार संदर्भात कायदा करताना समितीमध्ये डान्सबारचा प्रतिनिधी असावा
– डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको
– बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान 2 मीटरचे अंतर असावं
– ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
– डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
– बारबालांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं
– बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
हे बदल कायद्याने केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
2005 साली तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी डान्सबारवर बंदी घातली होती..
– 2005 साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी डान्सबारवर बंदी घातली
– वाढती व्यसनाधीनता, वाढती गुन्हेगारी, महिलांचं शोषणामुळे डान्सबार बंदीचा निर्णय
– बंदी घालण्यात आली तेव्हा सरकारी आकड्यांनुसार 800 नोंदणीकृत डान्सबार होते
– मुंबई परिसरात डान्सबारमध्ये काम करणाऱ्या 75 हजार बारबाला होत्या
– डान्सबार मालकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली
– सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवत काही नियम लागू करण्याचे आदेश दिले
– राज्य सरकारने 2016 साली पुन्हा राज्याचा सुधारित कायदा केला
नियमांमध्ये सुधारणा करून आता राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक संसारांची रोखरांगोळी करणाऱे, तरुणांना व्यसनाधीन करणारे डान्सबार पुन्हा सुरू होऊ नयेत अशीच अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Feb 19, 2025 | Trending News
Shiv Jayanti 2025: आज 19 फेब्रुवारी… आजच्याच दिवशी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे. शिवनेरीवर मोठ्या उत्साहात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आजवर शिवाजी महाराजांवर अनेक काव्य, पोवाडा रचले आहेत. पण तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांवर एक आरतीदेखील रचण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी रचलेली एकमेव आरती आहे. हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ही कवितादेखील सावरकरांनी रचलेली आहे. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडेदेखील रचले आहे. मात्र सावरकरांनी रचलेल्या या आरतीबद्दल फार कमी जणांना ठावूक आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या शिवकल्याण राजा या म्युझिक अल्बममध्ये लता मंगेशकर यांनी ही आरती गायली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर सावरकरांनी रचलेली एकमेव आरती
जयदेव जयदेव जय जय शिवराया l
या या अनन्य शरणा आर्यां ताराया llधृll
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला l
आला आला सावध हो भूपाला l
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला l
करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला llधृll
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी l
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी l
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता l
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता llधृll
त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो l
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो l
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया l
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या llधृll
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला l
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला l
देशास्तव शिवनेरी घेई देहाला l
देशास्तव रायगडी ठेवी देहाला l
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला l
जय देव जय देव जय जय शिवराया l
बोला छत्रपती शिवाजी महाराज की … जय ll
Source link
by Hansraj Agrawal | Feb 18, 2025 | Trending News
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. 2 जानेवारी 2025 पासून 47 दिवसांत 36 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.
Source link