Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात

Myanmar Earthquake : भूकंपामुळे म्यानमारमध्ये हाहाकार, मृतांची संख्या 1644 वर, भारताकडून ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात


Myanmar Earthquake : 28 मार्च रोजी म्यानमार येथे मोठा भूकंप झाला, या महाकाय भूकंपामुळे हाहाकार उडाला असून यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 1644 वर पोहोचला आहे. काही संस्थांनी हा मृत्यूचा आकडा 10 हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. म्यानमार सरकारच्या माहितीनुसार तीन हजाराहून अधिक लोक यात जखमी झाले असून 139 लोक अद्याप बेपत्ता आहेत. म्यानमार येथील भूकंपग्रस्तांना (Myanmar Earthquake) मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु करण्यात आलं असून भारतीय बचाव पथक तेथे दाखल झालं आहे. 

मृतांचा एकदा 10 हजारपर्यंत पोहोचण्याची शक्यता : 

बीबीसीच्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या 1,644 झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास 3,408 लोक यात जखमी आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने म्यानमारमध्ये मृतांची संख्या 10,000 पेक्षा जास्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्यानमारमधील भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले क्षेत्र मंडाले, बागो, मॅग्वे, उत्तर-पूर्व शान राज्य, सागाइंग आणि नायपीडाव आहेत. तर यंगून-मंडाले महामार्गाचे खूप नुकसान झाले असल्याने मदत कार्यात अडचणीत येत आहेत. 

हेही वाचा : Weather Update : कोकणात यलो अलर्ट, तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता; एप्रिल महिना नेमका कसा?

 

भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा : 

म्यानमारमधील भूकंपग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा मोहीम सुरु करण्यात आली आहे. भूकंपग्रस्त लोकांची मानवतावादी मदत करण्यासाठी ही मोहीम असून या अंतर्गत तंबू, ब्लँकेट, स्लीपिंग बॅग, फूड पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि आवश्यक औषधांसह 15 टन मदत सामग्री भारताकडून यंगूनला पाठवण्यात आली आहे.  भारतीय नौदलाची जहाजे INS सातपुडा आणि INS सावित्री जवळपास 40 टन सामग्री घेऊन मदत घेऊन यंगून बंदराच्या दिशेने निघाली आहेत. भारतासह न्यूझीलंडने देखील म्यानमारला दोन दशलक्ष न्यूझीलंड डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. तर चीन आणि रशियानेही  मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. 





Source link

आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल

आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्ंमहत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या रिपोर्टमध्ये सीबीआयने सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, ती आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे. सुशांत प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी तिला अटकही झाली होती. पण सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने रिया चक्रवर्तीला क्लीन चीट मिळाली असून, तिच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. यानंतर झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीची माफी मागितली आहे. 

माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल

माध्यमांच्या इतिहासात एक ऐतिहासिक घटना घडली आहे. जवळपास पाच वर्षांनी सुशांत प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चीट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीनेच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले होते. रियावर मीडिया ट्रायल सुरु होतं, तेव्हा आम्हीही त्याचा भाग होतो. पण आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. इतका मोठेपमा दाखवण्याचं धाडस यापूर्वी कोणत्याही माध्यमाने केललं नाही. पण सुभाष चंद्रा यांच्यासारख्या व्यक्तीने माफी मागणं हे धाडसाचं पाऊल आहे. आमच्या माफीनं भूतकाळ बदलणार नाही, भविष्य नक्कीच बदलेल असा विश्वास आम्हाला वाटत आहे. 

सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

“सुशांत सिंह हत्या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ठोस पुराव्यांअभावी हा रिपोर्ट देण्यात आला असं मी मानतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या संशयाला वाव उरत नाही. त्यामुळेच रियाच्या विरोधात कुणलीही केस उभी राहत नाही. मागे वळून पाहताना मला वाटतं रिया चक्रवर्तीला माध्यमांद्वारे आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी मीडियाच्या काही संपादकांनी आणि पत्रकारांकडून तिला आरोपी ठरवण्यात आलं होतं. झी न्यूजचा मार्गदर्शक म्हणून मी त्यांना सल्ला देतो की त्यांनी माफी मागण्याचं धाडस दाखवावं. यात माझा कोणताही सहभाग नसतानाही मी रियाची माफी मागतो. मी एकमुखी रुद्राक्षासारखा आहे. बाहेर आणि आतून समान. खऱ्याला नेहमी खरं म्हणतो,” असं सुभाष चंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

झी समूहाचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी उचललेल्या या पावलाचं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावतं, राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी स्वागत केलं आहे. “माफी मागितली आहे ती चांगली गोष्ट आहे. यामुळे साक्षात्कार होऊन आणि खासकरुन बेछूटपणे बोलणारी व्यक्ती आहे ज्यांनी यात पुढाकार घेतला होता त्यांनी माफी मागायला हवी. हिंदी चॅनेलने अत्यंत भयानक कव्हरेज केलं होतं. रिया चक्रवर्तीला धक्काबुक्कीही झाली होती. ती इतकी त्रासली होती, की मधमाशांप्रमाणे मीडिया तुटून पडलं होतं. तिच्या भावाला परदेशात शिकायला जाता आलं नाही. तिच्या कुटुंबालाही त्रास झाला. तिचं संपूर्ण करिअर जवळपास उद्ध्वस्त झालं. मीडियाने जर अशाप्रकारे पुढाकार घेतला. अटी-शर्थी न घातला केलं तर चांगलं होईल,” असं मत हेमंत देसाई यांनी मांडलं आहे. 

“मीदेखील सुभाष चंद्रा यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. आपण माध्यमांचे घटक आहोत याची लाज वाटावी अशी स्थिती त्याकाळी होती. मी त्यावेळी सातत्याने यावर वेगवेगळ्या लिहित होते. त्यावेळी मी माध्यमांचं गिधाडीकरण झालं आहे असा शब्द वापरला होता. ज्या वाईट रितीने रियाला टार्गेट करण्यात आलं होतं, ते अस्वस्थ कऱणार होतं. आता 5 वर्षानंतर एका माध्यमाचे प्रमुख आपला थेट सहभाग नसतानाही जाहीर माफी मागतात ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी फार मोठं मन असावं लागतं. माध्यम क्षेत्रात हा अपवाद आहे,” अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी दिली आहे.

“तुम्ही जो काही दगड आकात भिरकावला आहे त्यातून काहीतरी व्हावं अशी आशा आहे. ही एकाची नाही तर सामूहिक जबाबदारी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण त्याला म्हणत असतो. अनेक देशात माध्यमांची स्थिती पाहता, लोकशाही पाठच्या स्थरावर गेली आहे. उजव्या बाजूचं राजकारण तिथे आलं आहे. आपल्या देशात गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी मी त्यावेळी काँग्रेसतर्फे बाजू मांडत होतो. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं होतं हे त्यावेळी दिसत होतं. खऱ्या अर्थाने भाजपाने याचं खालच्या स्तराचं राजकारण केलं. महाविकास आघाडी सरकारला खाली आणणं आणि बिहार निवडणुकीत फायदा व्हावा हादेखील हेतू होता,” असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत,

 





Source link

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट! क्लोजर रिपोर्टवरुन वडिलांच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट! क्लोजर रिपोर्टवरुन वडिलांच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर आरोप



Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. या क्लोजर रिपोर्टवरुन दिशा सालियन यांच्या वडिलांच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केलाय.



Source link

Santosh Deshmukh Case : लाकडी काठी, लोखंडी रॉड, कोयता अन्…संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती समोर

Santosh Deshmukh Case : लाकडी काठी, लोखंडी रॉड, कोयता अन्…संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी अंगावर काटा आणणारी धक्कादायक माहिती समोर


Santosh Deshmukh Case : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींबाबत माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती. त्यावर मूठ तयार करून हत्यार बनविण्यात आले. तसंच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली. त्यातील एक गॅस, पाच क्लस वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ, स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केली आहेत.

कोणाच्या हातात कोणतं शस्त्र?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीने मारलं, फायटरने मारलं, 41 इंचाचा एक रॉड होता, त्याला करदोड्याने मूठ तयार करण्यात आली होती. या लोखंडी रॉडने संतोष देशमुख यांच्या अंगावर अनेक फटके मारण्यात आले. दरम्यान तपासामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करताना कोणत्या आरोपीकडे कोणते शस्त्र होते, याची कबुली सुदर्शन घुलेने दिली आहे. सुदर्शन घुले याचा दोषारोप पत्रामधील जबाबात सत्य समोर आलं आहे.

काय म्हणाला सुदर्शन घुले?

उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईटच्या काचेवर दगड सुधीर सांगळे यांनी मारला. तर त्यानंतर मी (सुदर्शन घुले) यांनी डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना बाहेर खेचले. त्यावेळी मी (सुदर्शन घुले) याच्या हातात गॅस पाईप होता. त्याने मारहाण केली. प्रतीक घुलेच्या हातात लाकडी काठी, महेश केदारच्या हातात लोखंडी रॉड, जयराम चाटेच्या हातात कोयता, कृष्णा आंधळेच्या हातात क्लच वायरचा बंच होता. तर सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप होता. तर जयराम चाटेने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावले.

तसंच बळजबरीने मारहाण करत स्कार्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केले. त्यावेळी स्कार्पिओ गाडी सुदर्शन घुले चालवत होता. तर जयराम चाटे हा स्विफ्ट गाडी चालवत होता. अशी माहिती घुलेने संतोष देशमुख हत्येच्या वेळीची दिली. 

जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेच्या जबाबात सुग्रीव कराड नावाचा उल्लेख आला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि गावातील लोकांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली होती. त्यामुळे वाल्मिक कराडची बदनामी झाली. म्हणून वाल्मिक कराडनं सुदर्शन घुले याला बदला घ्यायला सांगितलं होतं, असं जयराम चाटेनं आपल्या जबाबात म्हंटलं होतं. सुग्रीव कराड हा बीडच्या केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोब त्याने काम केलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यानं खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. मात्र आता सुग्रीव कराडने खासदार बजरंग सोनवणे यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे.





Source link

नाशिक कुंभमेळ्याचा नामकरणावरुन मोठा वाद! पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली

नाशिक कुंभमेळ्याचा नामकरणावरुन मोठा वाद! पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली



नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु असतानाच आता नामकरणावरुन मोठा वाद झाला आहे. पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली आहे. 



Source link

मनसेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो! अनेकांच्या भुवया उंचावल्या; मनसे म्हणते, 'भावनेच्या…'

मनसेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो! अनेकांच्या भुवया उंचावल्या; मनसे म्हणते, 'भावनेच्या…'


Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका पोस्टरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या पोस्टरवर आहे. मनसेच्या पोस्टरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

बाळासाहेब म्हणालेले, “माझा फोटो वापरायचा नाही”

शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत. 

…म्हणून शिंदेंही वापरतात बाळासाहेबांचा फोटो

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारने समाविष्ट केले आहे. त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येवू शकतो, असा युक्तीवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरपासून सातत्याने बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत. एकनाथ शिंदेंसहीत त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटो वापरतो. आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत. 

उद्धव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंना पत्रकारपरिषदेमध्ये मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यासंदर्भात विचारण्यात आलं. यावर उद्धव ठाकरेंनी, “आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळलं आहे की याशिवाय आता पर्याय नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

मनसे बॅनर्स काढणार

दरम्यान, मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. “ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील,” असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच, “सध्या या बॅनर्सची फक्त मिडिया मध्ये चर्चा सुरू आहे. “ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील,” असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते. 

राज ठाकरेंनी शिवसेना कधी सोडली?

राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तेव्हाच नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. 9 मार्च 2006 रोजी मुंबईत ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी कधीच बाळासाहेबांचा फोटो पोस्टर अथवा बॅनर्सवर वापरलेला नाही.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp