धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी!

धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी!


Mahant Namdeo Shastri Exclusive Interview: महंत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला. या पाठिंब्यानं धनंजय मुंडेंना समाजाची सहानुभूती मिळेल असं वाटलं होतं. पण झालं उलटच धनंजय मुंडेंना सहानुभूती मिळणं दूरच राहिलं, उलट नामदेवशास्त्रीच टीकेचे धनी झालेत. सहानुभूतीच्या या अस्त्राचं नामदेवशास्त्रींवरच बुमरँग झाल्याचं पाहायला मिळालं.

भगवानगडाचे मंहंत नामदेवशास्त्रींनी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंना आपण पाठिंबा दिल्यास समाजही धनंजय मुंडेंना पाठिंबा देईल आणि धनंजय मुंडेंविषयी सहानुभूती निर्माण होईल असा शास्त्रीजींचा अंदाज होता. पण त्यांनी जे ठरवलं ते झालं नाही. त्यांनी पाठिंबा जाहीर केल्या क्षणापासून त्यांच्या भूमिकेवर टीका होऊ लागली. झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंचं आपण वैयक्तिक भूमिकेतून पाठराखण केल्याचं सांगितलं.
एरव्ही राजकीय भूमिका न घेणारे नामदेवशास्त्री यावेळी मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण करताना पुढं आल्याचं पाहायला मिळालं. भगवानगडाचे महंत राजकीय भूमिका कशी घेऊ शकतात असा प्रश्न विचारल्यावर ही भूमिका भगवानगडाची असल्याचं घूमजाव नामदेवशास्त्रींनी केलं.

महंतांनी धनंजय मुंडेंच्या डोळ्यात वेदना आणि थकवा दिसल्याचं सांगितलं होतं. धनंजय मुंडेंच्या हातावरची सलाईनची सुई आणि रक्त दिसल्याचं सांगितलं.  झी 24 तासच्या मुलाखतीचा हवाला देत मनोज जरांगे पाटलांनी नामदेवशास्त्रींना संतोष देशमुखांच्या मुलांच्या वेदना दिसल्या नाही का असा प्रश्न विचारला..

 धनंजय मुंडेंची पाठराखण करणा-या महंतांच्या भूमिकेचा खासदार बजरंग सोनवणेंनी समाचार घेतला. नामदेवशास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठिशी समाजाचं बळ आहे हे सांगण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला. पण या पाठिंब्याचा त्यांच्यावरच बुमरँग झाला. धनंजय मुंडेंच्या पाठिशी सहानुभूतीचा लाट उभी राहण्याऐवजी नामदेवशास्त्रींविरोधातच संतापाची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.





Source link

आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!

आज शेवटची कर्जत ११:५१ वाजता, रविवारीही प्रवाशांचा खोळंबा; मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहून घ्या!


Mumbai Local Train Update: रविवारी तुम्हीदेखील प्रवास करण्याच्या विचारात आहात का? तर 2 फेब्रुवारी रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं काही लोकल रद्द करण्यात येतील तर काही लोक उशिराने धावणार आहेत. नागरिकांनी ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं अवाहन करण्यात येत आहे. तर, शनिवारी कल्याण-वांगणी दरम्याम ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील. तर, ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड – माटुंगादरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी – पनवेलदरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे – पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही. 

पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी – कांदिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक असणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. 

ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनसवरून निघणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस अंधेरी – बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

कल्याण – वांगणी दरम्यान शनिवारी रात्री ट्रॅफिक ब्लॉक 

कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वे शनिवारी रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल ११:५१ वाजता सीएसएमटीतून सुटणार आहे. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १:३० ते ३:३० या कालावधीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:५१ वाजता सुटेल आणि कर्जत येथे १:४९ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. 





Source link

बुट्ट्या गायकवाडचे मारेकरी कोण? 11 वर्षानंतर पुन्हा का होतीये चर्चा?

बुट्ट्या गायकवाडचे मारेकरी कोण? 11 वर्षानंतर पुन्हा का होतीये चर्चा?


बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणाची 11 वर्षानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षाही बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण गंभीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. गायकवाड यांच्या हत्येत भाजप आमदार सुरेश यांचा हात होता का?  याचा तपास करणं गरजेचं असल्याचं सदावर्ते यांनी म्हंटलं आहे. सदावर्तेंनी काय आरोप केले आहेत, आणि बीड प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या धस यांनी काय उत्तर दिलं आहे ते जाणून घ्या.

बुट्ट्या गायकवाडच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण?

बुट्ट्याच्या हत्येची फाईल ओपन करण्याची मागणी

आष्टीतील हत्येची 11 वर्षानंतर पुन्हा चर्चा

बुट्ट्या गायकवाडची 11 वर्षापूर्वी म्हणजेच 2014 साली हत्या झाली होती. या हत्येचा मास्टरमाईंड कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे, बापू आंधळेच्या हत्या कुणी केल्या असा सवाल भाजप नेते सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. 

सुरेश धसांनी परळीतल्या अनेक खुनांबाबत प्रश्न विचारला. एवढंच नव्हे तर पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रेवरही आरोप केले. भास्कर केंद्रे हे मटका व्यावसायिकाचे भागीदार असल्याचा आरोप केला. शिवाय त्यांचे 100 टिप्पर असल्याचाही आरोप सुरेश धसांनी केला.

स्वतः भास्कर केंद्रेंनी हे आरोप फेटाळले. भास्कर केंद्रेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये भास्कर केंद्रे असं नाव सांगणाऱ्यानं बुट्टेच्या हत्येमागं सुरेश धस असल्याचा आरोप केला. त्यावेळी तपास पथकात आपण होतो त्याच रागातून  सुरेश धसांनी आरोप केल्याचा दावा करण्यात आला.

वकील गुणरत्न सदावर्तेही आता पुढे आलेत. त्यांनी बुट्ट्या गायकवाड हत्येची फाईल रिओपन करण्याची मागणी केली आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीतही बुट्ट्या गायकवाडबाबत सुरेश धसांना विचारण्यात आलं. यावर धसांनी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

परळीच्या खुनांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर आष्टीतल्या बुट्ट्याच्या खुनाचीही पुन्हा चौकशी कऱण्याची मागणी होत आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत. बुट्ट्याच्या निमित्तानं सुरेश धसांचा इतिहास तर तपासून पाहिला जात नाही ना याची चर्चा सुरु झाली आहे. 





Source link

Guillain-Barre Syndrome: गिया बार्रे सिंड्रोमचा महाराष्ट्रात कहर! पुण्यात रुग्णसंख्या 130 वर

Guillain-Barre Syndrome: गिया बार्रे सिंड्रोमचा महाराष्ट्रात कहर! पुण्यात रुग्णसंख्या 130 वर


पुढील
बातमी

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! अत्यंत वर्दळीचा ‘हा’ मार्ग 5 दिवस बंद, असे आहेत पर्यायी मार्ग





Source link

जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण



चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.



Source link

Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार

Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार


पुढील
बातमी

जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल





Source link

YouTube
Instagram
WhatsApp