by Hansraj Agrawal | Mar 10, 2025 | Trending News
Beed Crime: सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झालेत. गुन्हे दाखल झाल्यापासून गेल्या चार दिवसांपासून खोक्या फरार आहे. खोक्याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाहीय. त्यामुळे खोक्याच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याची चर्चा सुरू झालीय.बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तिला मारहाण केल्या प्रकरणी बीडच्या सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुंड खोक्यावर हे गुन्हे दाखल झालेत.. यात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत पहिला गुन्हा नोंदविलाय. तर बावी परिसरात ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र गुन्हे दाखल होऊन चार दिवस झाले तरी खोक्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीय..शिरूर पोलीस ठाण्याची दोन पथकं खोक्याला पकडण्यासाठी रवाना झालीयत.. मात्र खोक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाहीय.. व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओ प्रकरणात खोक्यावर शिरूर पोलिसांत 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र याआधीही खोक्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीय..
आतापर्यंत खोक्यावर किती गुन्हे दाखल?
शिरूर – एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी 2 गुन्हे
शेवगाव – कौटुंबिक हिंसाचार आणि सदोष मुष्यवधाचा गुन्हा
पाटोद्यातील अमळनेर – खुनाचा प्रयत्न, मारहाण, घातक शस्त्राने मारहाण, बेकादेशीर जमाव जमवून दंगा घडवून आणण्याचा गुन्हा
नेवासा – सदोष मनुष्य़वध, दंगा घडवून आणण्यासंदर्भात गुन्हा
पाथर्डी – अपहरणाचा गुन्हा
शिरूर – घातक शस्त्राने मारहाण, बेकादेशीर जमाव जमवून दंगा घडवून आणण्यासंदर्भात गुन्हा
असे एक ना अनेक गंभीर गुन्हे आतापर्यंत सतीश भोसले उर्फ खोक्यावर दाखल आहेत.बॅटने मारहाण केल्या प्रकरणी चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालाय. मात्र या आधी खोक्यावर जे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते त्यावर खोक्यावर का कारवाई केली गेली नाही.? एवढे गंभीर गुन्हे दाखल असतानाही खोक्या मोकाट का फिरत होता?.सोशल मीडियावर शोबाजी करणारा खोक्या पोलिसांना कसा सापडला नाही.असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होताहेत. आता चर्चा झाल्यानंतर आणि माध्यमांनी विषय़ उचलून धरल्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झालीय. मात्र चार दिवस खोक्या पोलिसांच्या हाती सापडले नाहीय. त्यामुळे खोक्या गेला कुठे असा प्रश्न उपस्थि होतोय.
खोक्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास होता. वनविभागाच्या जागेवर त्याने एक ग्लास हाऊस उभारलंय. त्याचे एक एक कारनामे समोर आल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आली. खोक्या भाई रहात असलेल्या परिसरात वनविभागाने कारवाई करत अतिक्रमण उठवले. इतरांच्या झोपड्या वनविभागानं हटवल्या. खोक्याच्या ग्लास हाऊसवर मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाहीय.
खोक्याच्या ग्लास हाऊसवर हातोडा कधी?
खोक्या राहत असलेली शिरूर तालुक्यातील झापेवाडीची जागाही वनविभागाची आहे. खोक्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करून वास्तव्याला होता.खोक्यासह त्याचं कुटुंबही इथेच वास्तव्याला होतं. अनेक वर्ष वनजमिनीत अतिक्रमण असूनही वनविभागाने कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारला जातोय.सर्वसामान्यांनी वनविभागाच्या नियमांचं उल्लंघन केलं तर वनविभागाकडून तत्काळ कारवाई करण्यात येते. मात्र खोक्यावर एवढ्यावर्षांपासून का कारवाई केली गेली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. तर वनविभागाने तक्रार केल्यास कारवाई करू असं शिरूर पोलिसांनी म्हटलंय. एवढ्या वर्षात वनविभागाने खोक्याला अभय दिलं होतं का? की जाणिवपूर्वक डोळेझाक केली हा प्रश्न निर्माण होतोय. खोक्याचे एवढे कारनामे समोर येऊनही अद्याप त्याचा क्लास हाऊसवर कारवाई करण्यात आलेली नाहीय. वन विभाग खोक्याच्या क्लास हाऊसवर हातोडा कधी टाकणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 10, 2025 | Trending News
ST Bus Mahamandal: लालपरी ही गावाखेड्यात धावते. गावातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. मात्र एसटी गावात कधी येणार किंवा स्टँडवर कधी येणार याची वाट पाहावी लागते. एसटीच्या वेळा माहित नसल्याने कधी कधी प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. मात्र आता लवकरच प्रवाशांना एसटीचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे.
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाच्या माध्यमातून ‘लालपरी’चे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. बस स्टॅन्डवर कधी येईल, हे अचूक समजणार असल्याने त्यांना बससाठी ताटकळावे लागणार नाही. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविल्यावर अॅपवर बसची माहिती उपलब्ध होणार आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर येत्या काही आठवड्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, मधल्या थांब्यावर नेमकी कधी येणार, याची माहिती मिळत नाही. परिणामी त्यांना ताटकळत राहावे लागते. महामंडळाने यासाठी तयार केलेल्या ‘व्हीएलटी’च्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ अगोदर समजणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप वापरता येईल.
असे समजणार एसटीचे लोकेशन
प्रवाशांना अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे हेदेखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून, त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसंच, एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधाही देण्यात आलीय. गाडीचा चालक व वाहक यांचीही माहिती त्यामध्ये उपलब्ध करण्यात येणार असून, एखाद्या मार्गावर किती बस, कोठे आहेत आणि स्थानकावर पोचण्यास किती वेळ लागू शकतो, आदी माहितीही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहता येणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 9, 2025 | Trending News
Satish Bhosale Beed: मागील अनेक दिवसांपासून फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. खोक्याच्या अटकेसाठी बीडच्या शिरुरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तसंच खोक्यांनी केलेल्या गुन्ह्यात सुरेश धसांना सहआरोपी करण्याची मागणी देखील मोर्चातून करण्यात आली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या अटकेसाठी शिरुर बंदची हाक देण्यात आला होती. हाक देत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून खोक्या भाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरीही आरोपी खोक्याला अजून अटक करण्यात अपयश का आले? असाही सवाल मोर्चेकरांनी केलाय. तसंच खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्यानं सुरेश धसांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?
राजकीय वरदहस्तानं खोक्या आणि त्याच्या सहका-यांचा वन्यजीवांच्या तस्करीचा व्यवसाय आहे. आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखलकरा ढाकणे कुटुंबाची पोलिसांनी तक्रार का घेतली नाही याची चौकशी करा. पोलिसांवर कुणी दबाव टाकला याची चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांनाही सहआरोपी करावे, सतीश भोसलेचे आणखी कोणते अवैध धंदे आहेत याचा शोध घ्यावा.
सतीश भोसले उर्फ खोक्यानं आतापर्यंत 200 काळवीट तसंच 50 मोरांची हत्या केलीय असा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. तसंच या वन्य प्राण्यांचं मांस खोक्या काही राजकीय नेत्यांना देत असल्याचा आरोप देखील मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून खोक्याचे प्रताप समोर येत आहेत. कधी खोक्या टेबलावर पैसे फेकतोय. तर कधी खोक्या डीजेच्या गाडीवर चढून पैशांची उधळपट्टी करतोय. तर कधी कारमध्ये पैशांचा माज करताना दिसतोय. खोक्यानं शिरुरमधील शाळेत जात विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा देखील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात खोक्या हा विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतांना दिसतोय.
मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. तसंच खोक्याला लवकर अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा हा मोर्चेकरांनी दिला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 8, 2025 | Trending News
औरंगजेबाची कबर हटवावी हे सरकारचं मत आहे. पण कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औरंगजेबाच्या कबरीबाबत मोठं विधान केले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 8, 2025 | Trending News
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील खोक्या भाईचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यातच त्याला वन्य जीवांच्या मासाची आवड होती असेही समोर आले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 7, 2025 | Trending News
Living Will: लिव्हिंग विल करू इच्छिणाऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारद्वारे यंत्रणा उपलब्ध केली.
Source link