Pune Swargate Rape Case: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पोलिस तपासादरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. आरोपी खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे.
26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. बलात्कारानंतर आरोपी दत्ता गाडे हा फरार झाला होता. पोलिसांनी 77 तासानंतर आरोपीला त्याच्या गुनाट या गावातुन अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर या प्ररणात रोज नविन अपडेट समोर येत आहे. पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. आरोपी दत्ता गाडे खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे.
आरोपीची डीएनए चाचणी देखील पूर्ण झाली आहे. बसमध्ये आढळलेल्या केसांच्या नमुन्याच्या मदतीने चाचणी घेण्यात आली. बसमध्ये आढळलेल्या केसांचे नमुने आणि दत्ता गाडेच्या केसांच्या नमुन्यांची मॅचिंग करण्यात आलंय. लवकरच पुणे पोलिसांना चाचणीचा अहवाल मिळेल. डीएनए चाचणीच्या अहवालातून प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल.
पीडित तरुणीचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती केली. दादा मला जीवे मारू नको अशी पीडित तरुणीची दत्ता गाडेला विनंती केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचं फलटणला जायचं तिकीट पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केले आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेने आधीही असे गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे गाडेविरोधात ज्यांची तक्रार असेल त्यांनी पुढे यावं असं आवाहन गुन्हे शाखेने केले आहे. गाडेवर याआधीही महिलांसोबत गैरवर्तणूक केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडूनही याचाही तपास सुरू आहे.