गोंदिया:  देशभरातून मॉन्सून परतीच्या मार्गावर आहे. अनेक राज्यातून मॉन्सूनचा (Monsoon Withdrawal) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने उत्तरेकडील काही राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटच्या (Heat Wave) झळा जाणवत आहे. विदर्भात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यात उकाडा जाणावत आहे.  

ऑक्टोबरमधील वाढत्या उष्म्याने वर्धेकरांना चांगलाच घाम फोडला आहे. वर्धा जिल्हा आधीच उष्णता असताना आता  त्यात ऑक्टोबर हिटची भर पडलीय. त्यामुळं वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्मा असल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात ऑक्टोबरमध्येच घामाच्या धारा 

वर्ध्यात नाही तर हा परिणाम संपूर्ण विदर्भात दिसून येत आहे. विदर्भाला देखील या उष्म्याने घाम फोडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे 37.1 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  त्यापाठोपाठ अकोला आणि वर्धा हे दोन जिल्हे 36 अंश सेल्सिअस वर आहे. तापमान अचानक वाढले तर वातावरणात उष्मा वाढल्याने चांगलाच उकाडा निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर ,अकोला आणि, वर्ध्यात तापमानात वाढ झाली. वर्ध्याचे तापमान 36 अंशावर गेल्याने घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या चार पाच दिवसापासून वातावरणात उष्णता वाढल्याने आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होत आहे. वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात किती तापमान

तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या मॉन्सून देशाभरातून परतीच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.  किमान व कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. येत्या काही आठवड्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता  आहे. 

हे ही वाचा :

Weather Update : पुढील 48 तासांत परतीच्या पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांत पावसाचा अंदाज



Source link