अचलपूर मतदार संघातुन विधानसभेत बच्चू कडूचा पराभव करणारे भाजपचे आमदार प्रवीण तायडेची बच्चू कडूच्या उपोषणावर सडकून टिका

सोफिया प्रकल्पाच्या विरोधात आजचे आंदोलनकर्ते तेव्हा देखील सक्रिय होते… मात्र तेव्हा अशी कोणती देवाण-घेवाण झाली जे तुम्हाला आंदोलन स्थगित करावे लागले? असा सवाल उपस्थित केला

आता देखील आंदोलन करीत असताना व्हॅनिटी व्हॅनवर शंका उपस्थित करत प्रवीण तायडे यांनी आरोप केला की, बच्चू कडू हे दर दोन तासांनी व्हॅनिटी व्हॅन मध्ये जाऊन बसतात, शेतकऱ्यांनी यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या?

मी सुद्धा शेतकरी आहे शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असो तो आमच्यासाठी जिव्हाळ्याचा आहे, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या संदर्भात निश्चितच धोरण आखतील याचा मला विश्वास आहे…

राष्ट्रसंतांच्या समाधी जवळ उपोषण सुरू आहे मात्र उपोषणकर्ते हे महिलांबद्दल अभद्र भाषेत भाषण करताना दिसले…

बच्चू कडू हे 20 वर्ष सभागृहात राहिले त्यामुळे आता त्यांना बाहेर करमत नाहीये…

मोझरीला आंदोलन करण्यामागे काही कारण आहेत, नॅशनल हायवे असल्यामुळे चक्का जाम करता येतो, ते स्वतःचा पेंडॉल देखील जाळू शकतात, उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा तोच एक प्रकार त्यांच्याजवळ आहे…*

ते भाषणात नेहमी म्हणतात आम्हाला काही गरज नाही आमदारकीची, आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू, मग आता त्यांना शिक्षक मतदार संघ लढायची इतकी घाई का होत आहे ?…

कधीकाळी तेच शिक्षकांना शिव्या देत होते, राज्यात जो शिक्षक भरती घोटाळा झाला आहे तो त्यांच्याच राज्यमंत्री पदाच्या काळात झाला आहे त्यांनी आधी या सर्वांची उत्तरं द्यावी…

Source link