Maharashtra School : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 8 आणि 9 जुलै संपावर जाणार आहे. अनुदान आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत असल्याने हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुरकारला आहे. त्यामुळे राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद असणार की नाही याबद्दल पालक संभ्रमात होते. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने एक आदेश काढून त्याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे.
राज्यातील शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार?
येत्या 8 आणि 9 जुलैला राज्यातील शिक्षक समन्वय संघाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्यातील शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की, 8 जुलै मंगळवार आणि 9 जुलै बुधवारी राज्यातील शाळा बंद राहणार नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, 8 आणि 9 जुलैला शाळा असणार आहे.
आझाद मैदानावर आंदोलन
राज्यातील विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येत सरकारचे लक्ष वेधणार आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने मुंबईत येऊन सरकारला आपली नाराजी शिक्षण व्यक्त करणार आहेत.
गेल्या वर्षी, अनुदानित शाळांसाठी वाढीव आर्थिक अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून 75 दिवस राज्यव्यापी निदर्शने केली. सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या अधिकृत सरकारी ठरावात (जीआर) निधी वाटप करण्यात त्यांनी अपयशी ठरले, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, एक वर्षानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार हाती घेतलं आहे.