टोकियो, 29 जुलै :  हल्ली बरेच लोक श्वान पाळतात. काही लोक तर आपल्या श्वानाचा अगदी आपल्या मुलांसारखाच सांभाळ करतात. काही श्वान तर अगदी लक्झरी लाइफ जगतात. अशा श्वानांचे व्हायरल झालेले व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. त्यांना पाहून कधीतरी मनात असा विचारही आला असेल की काश याच्या जागी मी असतो तर… हा मजेचा भाग झाला. पण खरंच एका व्यक्तीने हे इतकं मनावर घेतलं की लाखो रुपये खर्चून तो श्वान झाला. आता पहिल्यांदाच घराबाहेर पडत तो खऱ्य श्वानांसमोर आला आहे.

तुम्ही पाहिलं असेल सामान्यपणे प्रत्येक प्राण्यांची एक हद्द असते. म्हणजे त्यांचा त्यांचा ठरलेला एरिया असतो. अगदी श्वान आपल्या परिसरात इतर ठिकाणच्या श्वानांना घेत नाही. दुसऱ्या ठिकाणचा किंवा नवा श्वान आला की त्या परिसरातील सर्व कुत्रे एकत्र येऊन त्या श्वानावर भुंकतात. असं असता हा माणूस जो श्वान बनला तो अशा खऱ्या श्वानांसमोर गेला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.

ऑर्डर न करताच आले 100 पार्सल, महिला शॉक; पाहण्यासाठी म्हणून बॉक्स उघडताच…

जपानमधील ही व्यक्ती जिचं नाव टोको असं आहे. तिला श्वान बनण्याची हौस होती आणि त्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले. जपानी कंपनी झेपेटने टोकोसाठी श्वानांचा असा ड्रेस तयार केला की तो घातल्यावर हा माणूस खरोखरच श्वान वाटू लागला. हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 40 दिवस लागले.

श्वानाचं रूप घेतल्यानंतर ही व्यक्ती श्नासारखंच आयुष्य जगू लागली. श्वानासारखं चालणं, श्वानासारखं खाणं-पिणं आणि श्वानासारखं एका पिंजऱ्यात बंदिस्त राहणं. सर्व सर्व काही या व्यक्तीने केलं. एक दिवस ती घराबाहेर पडली आणि श्वानासारखं फिरून पाहू लागली. एका चॅनेलने या व्यक्तीची मुलाखत घेतल्यानंतर त्याचा हा व्हिडीओ केला होता. जो या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

लांडोर आणि पोलिसांची अनोखी मैत्री; लोक म्हणतात, हे तर…

व्हिडीओत जो भलामोठा श्वान दिसतो आहे, तो खरंतर माणूस नाही. पाहिल्यावर तुमचाही यावर विश्वास बसणार नाही. त्याच्या गळ्यात बेल्ट अडकवला आहे आणि श्वानासारखाच तो फिरतो आहे, बसतो आहे. यादरम्यान त्याच्यासमोर खरे श्वानही येतात. ते पाहून तर त्याला घाबरतातच. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात पण लगेच त्याच्यापासून दूर होताना दिसतात.

” isDesktop=”true” id=”929228″ >

श्वान बनलेल्या या व्यक्तीचं I want to be an animal या नावाचं युट्यूब चॅनेल आहे. तिथंच हा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link