Navi Mumbai School Crime News: नवी मुंबईमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारा एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एक शिक्षिका विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे.

गुन्हा दाखल अन् अटक

व्हिडीओ कॉलवरून अश्लील चाळे दाखवत एक शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करत असल्याचा प्रकार समोर आल्याने कोपरखैरणेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला. या शिक्षिकेला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. एका विद्यार्थ्यासोबतच तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

काय करायची शिक्षिका?

कोपरखैरणेतील एका शाळेतील शिक्षिकेचे आक्षेपार्ह कृत्य समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी ही 35 वर्षीय शिक्षिका तिच्याच वर्गातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. यासाठी ती स्वतःचे अर्धनग्न फोटो, व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पाठवत होती. त्याशिवाय व्हिडीओ कॉल करूनअश्लील कृत्य करायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा सारा प्रकार सुरु होता.

कसा समोर आला हा प्रकार?

मात्र, या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यासोबत केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे हा प्रकार पालकांच्या व पोलिसांच्या निदर्शनात आला. तेव्हा तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

पालकांना मोठा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिक्षिका उलवे परिसरात राहणारी असून तिने इतरही काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे उत्तेजित करून गळाला लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिने त्यांच्यासोबत गैरकृत्य केले आहे का? याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. मात्र, शिक्षिकेच्या या कृत्याने पालकांना धक्का बसला आहे.

मुंबईतही समोर आलेला असाच काहीसा धक्कादायक प्रकार

काही आठवड्यांपूर्वी दादरमधील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. या विद्यार्थ्याला त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ही शिक्षिका दक्षिण मुंबईतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये या विद्यार्थ्याला घेऊन जायची. तिथे ती त्याच्यासोबत अश्लील चाळे करायची आणि नंतर शरीरसंबंध ठेवायची. बराच काळ हा प्रकार सुरु होता. हा मुलगा तणावात राहू लागल्याने पालकांना शंका आल्यावर त्यांनी विचारपूस केली असता हा प्रकार उघड झाला. या शिक्षिकेने कोर्टासमोर दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते असा दावा केला आहे.





Source link