अकोला : महायुतीसाठी एक दिलासादायक बातमी असून अकोल्यामधील (Akola Lok Sabha Election)  बंड रोखण्यास भाजप नेत्यांना यश आल्याचं दिसतंय. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचं बंड शांत झालं आहे. नारायण गव्हाणकरांनी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी बंड मागे घेतलं असून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्यासमोरील मोठं आव्हान दूर झालं आहे. 

देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कामाला

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गव्हाणकरांची मनधरणी करण्यात यशं आलंय. फडणवीसांनी रविवारी दुपारी पावणे 2 वाजता गव्हाणकरांना फोन केला होता. नंतर गव्हाणकरांनी माघारीचा निर्णय घेतला आहे. आता गव्हाणकर अनुप धोत्रेंचा प्रचार करणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. आमदार गव्हाणकर अकोल्याच्या स्थानिक भाजप नेतृत्वावर नाराज होते. आज माझ्यावर अन्याय झालाय, पण अजूनही स्थानिक भाजप नेत्यांचा फोन नाही आला अशी त्यांनी तक्रार केली आहे. 

दरम्यान, अकोट, तेल्हारा, पातूर, बाळापूर सर्व मतदारसंघ फिरलो होतो. आज देवेंद्रजींनी जरी फोन केला असला तरी याशिवाय माझ्या मार्गदर्शकांनी मला सूचवलं समजावलं आणि मी माघारीचा हा निर्णय घेतला गेला. मला कोणतेही आश्वासन मिळालं नाही, निवडणुकीनंतर निर्णय घेऊ असं आश्वासन मिळालं आहे. परंतु आज लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही असेही गव्हाणकर यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अनुप धोत्रेचा प्रचार करायचा की नाही हे येणारी वेळच ही येणारी वेळ आणि काळच सांगणार. असे स्पष्टच गव्हाणकर बोलले.

कोण आहेत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर? 

नारायण गव्हाणकर हे जनसंघापासून भाजपात कार्यरत आहे. 1995 आणि 2004 असे दोनदा अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून विजयी झाले आहे. 2000 ते 2003 भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष राहिले आहे. 2004 मध्ये लोकसभेसाठी सक्षम दावेदार होते. मात्र तेव्हा त्यांना डावलून संजय धोत्रेंना उमेदवारी दिली आहे. पुढे सलग चारदा संजय धोत्रे अकोल्यातून भाजपचे खासदार म्हणून विजयी झाले. 1980 ते 1885 बाळापूर निमकर्दा गावचे सरपंच राहिले आहे. 

अकोला जिल्ह्यात कुणबी समाजाचे नेते म्हणून राजकारणावर चांगली पकड आहे. भाजपाच्या अंतर्गत राजकारणात संजय धोत्रे आणि डॉ. रणजीत पाटलांचे दोन गट तयार झाले आहे. गव्हाणकर डॉ. रणजीत पाटील गटात असल्याचे बोललं जातंय. तर मुलगा राम गव्हाणकर सध्या वंचितचा जिल्हा परिषद सदस्य आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link