Akola News : अकोल्यात शनिवारी रात्री उपोषणकर्ते कामगारांच्या रोषामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना एका कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय. अकोला (Akola) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसापासून बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने हे उपोषण सुरु आहे. अकोला ऑइल इंडस्ट्रीज आणि बिर्ला ऑइल मिल हे तीस वर्षांपूर्वीच बंद पडले आहे. मात्र, 70 कामगारांची देणी थकल्याने या कामगारांचे कुटुंबीय मिलच्या जागेतच राहतायेत. त्यामुळे त्यांच्याकडून उपोषण सुरु आहे. याच उपोषणकर्ते कामगारांच्या रोषाचा सामना टाळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय.

दरम्यान शनिवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘बोलके रस्ते’ या सौंदर्यकरण प्रकल्पाचा उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होते. यासाठी विखे पाटील यांची वेळ घेऊन संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, याच कार्यालयाच्या परिसरात उपोषण करणाऱ्या कामगारांनी पालकमंत्र्यांनी आपल्याला भेटावं अशी मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री न भेटताच निघून गेल्याने कामगारांनी पालकमंत्री आणि सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त केलाय. यावेळी बोलताना कामगारांच्या भावना अनावर झाल्या होत्या. तर, यावर विखे पाटील यांचीप्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. 

भूमी अभिलेख, मालमत्ता नोंदणीसह खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयाबाबत महत्वाचा निर्णय 

विखे पाटील अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रांत आणि तहसील कार्यालयाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, “राज्याभरात भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयं आता तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरात होणार आहे. अनेक ठिकाणी ही कार्यालयं बाहेर असल्याने गैरव्यवहार होत असल्याची कबुली देखील विखे यांनी दिली. तर, चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख विखे पाटील यांनी केला. 

नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसला…

विखे पाटील यांच्या याच दौऱ्यात त्यांच्या हस्ते मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आले. तसेच लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थानाचे 2 कोटी रुपयांच्या निधीतून सभागृह व सौदर्गीकरण कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. तर यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, “नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसून, सर्वसामान्यांना परवडेल अशा परात वाळ उपलब्ध होणार आहे. वाळू तस्करी संपवण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात बाळू उपलब्य होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे, हे धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Radhakrishna Vikhe Patil : “संजय राऊतांना भरपूर शिकायचंय ते भरकटलेले नेते”; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

अधिक पाहा..



Source link