अमरावती : लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आता भाजपाच्या इतर उमेदवारांसाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसींविरुद्ध (Asaduddin owaisi) भाजपच्या माधवी लता यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, औवेसी बंधुवर जोरदार हल्लाबोल केला. नवनीत राणांनी अकबरुद्दीन औवेसींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत केवळ 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग दोन्ही भावांना कुठून कुठे पळावं हे समजणार नाही, असे म्हणत निशाणा साधला होता. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसी यांनी एक व्हिडिओ शेअर करत नवनीत राणांचे नाव न घेता, पलटवार केला. माझा लहान भाऊ तोफ आहे, असे ओवैसींनी म्हटलं होत. त्यानंतर, पुन्हा नवनीत राणा यांनी व्हिडिओ शेअर  करत असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. असल्या तोफा आम्ही सजावटीसाठी वापरतो, असे नवनीत राणांनी म्हटले आहे. 

नवनीत राणांच्या हैदराबादमधील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिंदू शेरणी म्हणत नवनीत राणांच्या भाषणाचं भाजपा समर्थकांकडून समर्थन होत आहे. राणा यांच्या भाषणावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही राणांना प्रतिआव्हान दिलं. ओवैसींनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ओवैसी म्हणाले की, “छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) तोफ आहे, तोफ… तो कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही. त्याला समजावू शकणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. ज्या दिवशी मी लहान भावाला सांगितलं, मी आराम करतो, आता तू सांभाळ. मग त्यावेळी तुम्हीच सांभाळा. तुम्हाला छोटा माहितीय ना? तोफ आहे तो…”, असे असदुद्दीन औवेसींनी म्हटलं होतं. त्यावर, आता नवनीता राणांनी पलटवार केला आहे.  

ओवैसीनी सांगितले की माझा लहान भाऊ तोफ आहे. औवेसी अशा तोफांना आम्ही घरासमोर सजावटीत ठेवतो. मोठा सांगतोय की लहान खूप खुंकार आहे, अरे असे खुंकार आम्ही घरी पाळतो, अशा शब्दात नवनीत राणा यांनी औवेसींवर हल्लाबोल केला. तसेच, मी पण पाहते मुर्गी ओर मुर्गी का बच्चा कबतक खैर मनाता हे. मोठा सांगतोय की मी लहान भावाला समजावून ठेवलं आहे. अरे समजावून ठेवलं म्हणून नजरेसमोर आहे, नाहीतर देशात गल्लोगल्लीत शेर रामभक्त राहतात, असा इशाराही नवनीत राणा यांनी औवेसींना दिला. तसेच, आता लवकरच मी हैदराबादला येणार आहे, पाहते कोण अडवते मला, असेही राणांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. 

नवनीत राणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. आता या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणालेल्या. राणांच्या याच वक्तव्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा

VIDEO : आम्हाला 15 सेकंद पुरे, नवनीत राणांचा ओवैसींना पुन्हा इशारा

अधिक पाहा..Source link