Crime News :  भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणाऱ्या अध्यात्मिक गुरुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतील जिल्ह्यातील (Amravati) तिवसा (Tivsa) तालुक्यात ही घटना घडली. मार्डी येथील आश्रमातील भोंदु गुरुदास बाबा (Gurudas Baba) उर्फ सुनील कावलकर (Sunil Kavalkar) विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे. तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा प्रसिद्ध झाला होता.

नेमकं काय झालं?

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेला भोंदूबाबा सुनील जानराव कावलकर याचा आश्रम आहे. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदासबाबांच्या आश्रमात येते. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा या अपेक्षेने समाधान शोधत होती. हा गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो हेच तीला सांगण्यात आले होते. मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी येथे गुरुदासबाबाच्या आश्रमात आली.तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली.

दरम्यान गुरुदासबाबा ने तीच्या भावनांचा फायदा घेऊन तुझा पती सुधारला तर ठीक अन्यथा मीच तुझ्याही लग्न करणार असे सांगून खाण्यात अंगारा सारखे देऊन जवळपास तीन महिन्यापर्यंत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान एक दिवस या दुराचारी बाबाचा मोबाईल फोन तिच्या हाती लागला. आता त्या फोनमध्ये तिच्यावरील अत्याचारची चित्रफीत त्याने बनवलेली असल्याचे तिचे म्हणणे आहे. घडलेला प्रकार लक्षात आल्याने भीतीपोटी काहीही न बोलत तीने मी आश्रमात राहणार नाही असे सांगीतल्या नंतर गुरुदासबाबाने 2 जानेवारीला पिडीतीला नागपूरपर्यंत नेऊन सोडले. मे 2023 पासून 2 जानेवारी 2024 पर्यंत ती आश्रमात होती.या दरम्यान तिचे कुटुंबात काहीच चांगले झाले नाही. त्यामुळे तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरुदासबाबा याला फोन केला आणि विचारणा केली असता गुरुदासबाबाने तिलाच धमकावले. यावरून पीडित महिलेने कुन्हा पोलिस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या बाबीची जबानी दिल्यावरून कुन्हा पोलिस स्टेशनमध्ये भोंदू गुरुदासबाब उर्फ सुनील जानराव कावलकर (वय 47) यावर अत्याचार, धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुदासबाब हा फरार असून त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेने भोंदू बाबा विरोधात अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला आहे. फरार भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. 

तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीत एका महाराजाला अटक 

वारकरी संप्रदायाला हदरवणारी घटना पुण्यातील देवाची आळंदीत (Devachi Alandi Pune) घडली आहे. एका महाराजावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं वारकरी सांप्रदयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तीन अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप या महाराजावर आहे. दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर (52 वर्षे) असं या नराधम महाराजाचे नाव आहे. 

दासोपंत महाराज मृदुंग वारकरी शिक्षण संस्था चालवतो. साधारण सत्तर विद्यार्थी दासोपंत महाराजांकडे मृदुंग वाद्याचं धडे घेतात. पण दिवाळीनंतर दासोपंत बिथरले, सुरुवातीला एक व्यसनाधीन विद्यार्थ्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केलं. मग त्यानंतर दासोपंत महाराजांमधील हैवान जागा झाला. तीन विद्यार्थ्यांवर मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करतच राहिले. कोणाला सांगितल्यास बरं वाईट होईल असं त्यानं धमकावले होते. 

अधिक पाहा..Source link