अकोला: जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच दुसऱ्या मुलाच्या मदतीनं पोटच्या मुलाला संपवलं आहे (Akola Honour Killing Case). ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय 26) असं मृत तरुणाच नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी बापाचं नाव आहे. 

मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले होते, त्यानंतर शुक्रवारी ते गावात परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे. 

तरूण पुण्यात नोकरीला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गाव आहे. या गावात नागोराव गावंडे हा व्यक्ती वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुलं असून त्यातील एकाच नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. 

संदीपचं गावातील एका दलित कुटुंबातील मुलीवर प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला होता. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याचवरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. 

संदीपच्या वडिलांच्या विरोधामुळे या दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी यावर कायम तोडगा करण्याचा निश्चय केलाय. त्यानंतर त्यांनी इतर मुलांच्या मदतीने संदीपची हत्या केली. 

तरुणीला बुलेटस्वार तरुणांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न

राज्यात गोळीबारांचा थरार सुरू असतानाच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायk घटना घडली. तरुणी आपल्या मैत्रिणीला रुग्णालयात घेऊन जात असतानाच बुलेटवरून आलेल्या तरणांनी भर रस्त्यात अडवून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित तरुणीने वेळीच प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केल्याने बुलेटस्वार तरुण पळून गेले. 

या प्रकरणी संबंधित तरुणीने बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या तरुणांचा शोध सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..Source link