शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस- भाजपवरही ‘प्रहार’
छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशातली वतनदारी बंद केली आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर कापले जाल असं म्हणणारा राजा आता कोणत्याच पक्षात दिसत नाही. 50% नफा धरून आम्ही शेतमालाला भाव देऊ असं भाजपने म्हटलं होतं आणि काँग्रेसने स्वामीनाथन आयोग लागू करू असं म्हटलं होतं. मात्र काँग्रेसने सुद्धा ते लागू केलं नाही. पार्टी कोणतीही असली तरी ते शेतकऱ्यांच्या हितासाठी राहत नाही, हे 75 वर्षात आपण पाहिलं. मी हे शेतकरी म्हणून बोलत आहे. त्याचा राग आला तरी चालेल, बच्चू कडू याची पर्वा करत नसल्याचे ही बच्चू कडू म्हणाले.
विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू, रिसोड तालुक्यातील घटना
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव शेतशिवारात विषबाधेमुळे 15 शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुपारी काही शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असता, हळदीच्या पिकासाठी वापरण्यात येणाऱ्या फवारणीसाठी वापरण्यात येणारे औषध टाकीतील विषारी पाणी प्यायल्याने त्यांना विषबाधा झाली. रासायनिक कीटकनाशकेच हे पाणी पिल्यामुळे 15 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या घटनेत काही शेळ्यांना देखील विषबाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेळीपालकांच मोठं आर्थिक नुकसान झालंय.
हे ही वाचा
अधिक पाहा..