Amravati Car Firing :  अमरावती जिल्ह्यातील (Amravati District ) दर्यापूर येथे गुरूवार 7 डिसेंबरच्या रात्री झालेले गोळीबार (Firing) प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील फरार झालेल्या अन्य तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अटक आलेले तिघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ अमरावतीवरुन अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करुन गोळीबाराची थरारक घटना घडली होती. ज्यामध्ये पाठीमागे येणाऱ्या कारमधून आरोपींनी दोन राऊंड फायर केल्या. यात कारमध्ये बसलेली युवतीसह तिचे आई-वडील जखमी झाले होते. त्यानंतर गोळीबार करुन आरोपींनी पळ काढला असता, अवघ्या काही तासात दर्यापूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपींनी अटक केली आहे.  

काय होते प्रकरण ?

या प्रकरणातील आरोपी महेश जालमसिंग हरदे आणि जखमी पीडित तरूणीची इंस्टाग्रामवर तीन-चार महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. आरोपी हा बंगलोरमध्ये प्रापर्टी ब्रोकर म्हणन काम करीत होता, जखमी तरूणी ही अमरावती येथे शिक्षण घेत होती. कालांतराने या दोघांमध्ये मैत्री अधिक घट्ट होत गेली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. दरम्यान आरोपी हा बंगलोर वरून अमरावती येथे वास्तव्यास आला. त्यासाठी त्याने अमरावती मधील कठोरा नाका परिसरात भाड्याने घर देखील घेतले. कालांतराने या दोघांमध्ये काही वाद झाला आणि आरोपी हा काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीच्या अंजनगाव येथील घरी गेला. त्याठिकाणी पीडित तरुणीच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांच्यासोबत त्याने वाद घातला. मी तुमच्या मुलीसोबत लग्न केले आहे, तिला माझ्या सोबत पाठवा असा तगादा त्यावेळी आरोपीने लावला. तसेच त्याने दोघांच्या विवाह संबंधाचे कागदपत्रे सुध्दा दाखवले. मात्र पीडित तरुणीने हे सर्व कागदपत्र बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी त्यास घरातून निघून जाण्यास सांगितले.

चालत्या गाडीवर दोन राऊंड फायर

पीडित तरुणीने अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन गाठून  1 डिसेंबरला  आरोपींविरुद्ध तक्रार दिली. तर दुसरीकडे आरोपी महेश हरदे याने देखील पीडित तरुणी आणि तीच्या आई-वडीलांच्या नावाने अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी आणि तीच्या आईवडिलांच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले. त्यावरून 7 डिसेंबरला पीडित तरूणी ही तिची आई वडील आणि परीचयातील गजानन हरपुळे सोबत  गाडगेनगर पोलिस स्टेशन येथे आले होते. त्यानंतर चौकशी आटपून ते अमरावती ते अंजनगाव कडे जाण्याकरीता निघाले असता आरोपीने दुचाकी आणि चारचाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला. गाडी दर्यापूर येथील पेट्रोल पंपाजवळ आली असता आरोपीने चालत्या वाहनातून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पीडित तरुणीच्या मानेला गोळी लागली तसेच गजानन हरपुळे सुध्दा जखमी झाले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन भातकुली मार्गे अमरावती शहर-कारंजा लाड असे पळुन गेले.पोलीसांनी त्वरीत सतर्कता दाखवून केलेल्या पाठलागाअंती आरोपीला वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे अटक केली. या गुन्हात गुन्हा आरोपी महेश जालमसिंग हरदे यांच्यासह  श्रध्दा हरेल (वय22 ) अजय चंद्रकांत पवार (वय 45) सर्व रा मलकापूर आणि अन्य फरार साथीदार सोबत असल्याचे सांगीतले. या प्रकरणातील पुढील तपास दर्यापुर पोलीस करित आहे.Source link