अकोला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक नव्हते, असं म्हणणाऱ्या नितेश राणेंनी (Nitesh Rane) नितीन गडकरींकडे (Nitin Gadkari) शिकवणी लावावी, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) राणेंना लगावलाय. तर देशात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात केंद्रानं लवकरच कठोर कायदा करावा, अशी मागणी ही त्यांनी केलीये. घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी भाष्य करत महायुतीतील नेत्यालाच एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे. ते अकोला येथे बोलत होते.
पुतळा घरावर उभारणं हे आपलं भाग्य- अमोल मिटकरी
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा 7 एप्रिलला आपल्या नव्या घरात गृहप्रवेश होतोय. अकोल्यातील आरोग्यनगर भागातील ‘शिव-संभव’ निवासस्थानावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. मिटकरींनी आपल्या घरावर या पुतळ्याची प्रतिष्ठापना केलीय. 9 फुट उंच आणि 6 फुट उंच चौथरा असा हा 15 फुट उंचीचा पुतळा झालाय.
हा क्षण माझ्या दृष्टीनं अत्यंत भावनिक-अमोल मिटकरी
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर राज्यात सुरू असलेलं राजकारण हे अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजांचे विचार सांगूनच आपण येथपर्यंत आल्यानं त्यांचा पुतळा घरावर उभारणं हे आपलं भाग्य असल्याचं आणि हा क्षण माझ्या दृष्टीनं अत्यंत भावनिक असल्याचे ही आमदार मिटकरी म्हणालेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम लोक नव्हते असं म्हणणाऱ्या नितेश राणेंनी नितीन गडकरींकडे शिकवणी लावण्याचा टोला आमदार मिटकरींनी राणेंना लगावलाय. तर देशात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात केंद्रानं लवकरच कठोर कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केलीये.
शेतकऱ्यांचे मन दुखावले असतील तर ‘मी’ जाहीर माफी मागतो
कर्जमाफीच्या (loan waiver ) मुद्यांवर बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना (Farmers) खडे बोल सुनावले होते. त्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषीमंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य केलं नाही, असेही कोकाटे यांनी म्हटलंय. दरम्यान याच मुद्यावरून आमदार अमोल मिटकरींनी भाष्य करत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मन दुखावले असतील तर ‘मी’ जाहीर माफी मागतो. असे म्हणत अमोल मिटकरी यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांना जाहीर माफी मागितली आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..