Akola News अकोला : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या प्रमुख उपस्थित अकोल्यात होत असलेल्य हिंदू बाहुबली संमेलनाकडे नागरिकांनी अक्षरक्ष: पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. मात्र, सभागृहात फक्त तुरळक लोक उपस्थित असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांच्यासोबतच प्रख्यात बॉडी बिल्डर भारतसिंग वालिया हे सुद्धा उपस्थित आहे. आज दुपारी 4 वाजताची या कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती. तर कार्यक्रमाला गर्दी नसल्याने नितेश राणे जवळ जवळ पाऊण तास सभागृहात उशिरा आलेत. परिणामी, सभागृह भरण्याची शक्यता कमी असल्याने आयोजकांचं आयोजन फसल्याचीही चर्चा सध्या रंगू लागली आहे.
पोलीस बॉईज संघटनेने दाखवले काळे झेंडे
दुसरीकडे राज्यातील कथित लव्ह जिहादबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या वक्तव्याचे पडसाद आज अकोल्यात देखील उमटतांना दिसले आहे. अकोल्यात पोलीस बॉईज संघटनेने आमदार नितेश राणेंना काळे झेंडे दाखविले आहेत. भाजपचे नितेश राणे यांनी या ठिकाणी बायकोचा फोन येत नाही त्या ठिकाणी पाठवू अशा शब्दात पोलिसांना धमकी दिलीय. त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलीस बॉईज संघटने कडाडून विरोध केलाय.
आज नितेश राणे अकोल्यातील कार्यक्रमस्थळी जात असताना शहरातील निमवाडी चौकात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदविण्यात आलाय. नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन एक स्फोटक वक्तव्य केले होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्या या विधानावरुन अकोल्यात पोलीस बॉईज संघटनेने हा विरोध दर्शवला आहे.
माझ्या वक्तव्यावर मी ठामच, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात- नितेश राणे
राज्यातील कथित लव्ह जिहादबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या सगळ्या घडामोडींबाबत भाष्य करताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. त्यांना आम्ही सोडणार नसल्याचे म्हणत पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले.
पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
हे ही वाचा
अधिक पाहा..