Amravati News : अमरावतीच्या (Amravati News) अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघड येताच या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केलाय. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. परिणामी, शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय? असा सवाल आयात उपस्थित  केला जातोय. 

मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये पुन्हा आढळल्या अळ्या

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी  तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे. मात्र अनेकदा ही योजना  वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय, अशी शंकाही  या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून वेळोवेळी पुढे आली आहे. या अगोदर देखील  यवतमाळच्या (Yavatmal News) उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये  अळ्या आढळून आल्या होत्या.

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?

शिक्षण विभागाच्या (Education Department) आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. त्यातील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र, त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारत ते चॉकलेट परत केले होते. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. तर असाच काहीसा प्रकार  पंढरपुरात देखील घडला होता. यात चक्क पोषण आहारात  मृत बेडूक आढळून आला होता. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार त्यावेळी घडला होता. त्यामुळे सातत्याने घडत असलेल्या या घटना लक्षात घेता पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. 

विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केलं जातय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link