mumbai university admission 2024 : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एकेडॅमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. 

ही सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर व्हिडिओ लिंक देण्यात आली आहे.

पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया २५ मे २०२४ पासून

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया २५ मे २०२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत लवकरच जाहीर केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

असं आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेशअर्ज सादर करणे- २२ मे  ते १५ जून २०२४

विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी – २० जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)

तात्पुरती गुणवत्ता यादी- २१ जून २०२४ ( संध्याकाळी ६ वाजता)

विद्यार्थी तक्रार – २५ जून २०२४ (दुपारी १ वाजेपर्यंत)

पहिली गुणवत्ता यादी – २६ जून २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – २७ जून ते ०१ जुलै २०२४ ( संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

द्वितीय गुणवत्ता यादी- ०२ जुलै २०२४ (संध्याकाळी ६ वाजता)

ऑनलाईन शुल्क भरणे – ०३ जुलै ते ५ जुलै २०२४ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)

कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स – ०१ जुलै २०२४

Source link