Bacchu Kadu : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना विरोधकांनी टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरून विभागीय सहनिबंधकांनी अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस बजावली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली आहे. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिलाय. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना बजावण्यात आली आहे. 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता साक्ष नोंदविण्याकरिता समक्ष अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

पंधरा दिवसात म्हणणं मांडण्याचे आदेश

दरम्यान, 2017 साली नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 साली बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याच प्रकरणाचा दाखला देत विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांना संचालक पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. बच्चू कडू यांना पंधरा दिवसात त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणात आता नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली

Kiran Samant: राजन साळवींचा शिंदे गटात पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला, पण सामंत बंधुंचा विरोध? किरण सामंतांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले…

अधिक पाहा..



Source link