Amol Mitkari On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्ष उभारणीमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) साहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) हा पक्ष उभा केला त्यानंतर जयंत पाटील, आर. आर आबा, अजित दादा पवार  या सर्वांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. अशातच नव्याने आलेला एक नवखा  युवक नव्याने आमदार होतो आणि सध्या ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी फार कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे आयत्या बिळावर नागोबा ही म्हण आहे त्याचप्रमाणे रोहित पवार (Rohit Pawar) कृत्य करत आहे. यातूनच त्यांचे हे बालिशपणाचे वक्तव्य पुढे येत आहे. अशी बोचरी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

रोहित पवार आणि जयंत पाटलांच्या शीतयुद्धात अमोल मिटकरींची उडी  

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा अहमदनगरमध्ये पार पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पक्षात कुठं तरी अंतर्गत कलह तर सुरू नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षांतर्गत कलह शरद पवारांची (Sharad Pawar) डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. कारण, नगरमधील 25व्या वर्धापनदिन सोहळ्यात रोहित पवार यांनी नाव न घेता थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले.

त्यानंतर, राज्यात चर्चा सुरू झाली ती पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाची. त्यातच, रोहित पवार (Rohit Pawar) समर्थक आणि जयंत पाटील समर्थकही सोशल मीडियातून भिडल्याचं पाहायला मिळालं. यात आता अमोल मिटकरी यांनी उडी घेत  जयंत पाटील यांची पाठराखण केली आहे. तर रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

रोहित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री व्हायचे आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील हे किलर म्हणता येईल असेच नेतृत्व आहे. अलीकडे त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे कुणालाही आवडलेलं नाही. याबाबत स्वतः जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे  नुसतं ट्विटरवर टीवटीव करण्यापेक्षा याबाबत पवार साहेबांना सांगितले पाहिजे. यात काही चुकीचे वाटत असल्यास पवार साहेब त्यावर निर्णय घेतील, असा सल्लाही अमोल मिटकरी यांनी दिला आहे. मात्र असे सांगून देखील हा नेता असे वक्तव्य करत आहे. कारण रोहित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री व्हायचे आहे, असेच यातून दिसत आहे.

जयंत पाटील याचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम वाजवतील 

अजित दादा ज्यावेळी पक्षात होते त्यावेळी देखील अशाच पद्धतीने त्रास दिला जात होता. तेव्हा देखील अजितदादा पवार यांनी काही वेगळं मागितले नव्हतं. त्यावेळी अजित दादांनी हेच सांगितलं होतं की,  शरद पवार साहेबांचं वय हे 82 झालेला आहे.  त्यामुळे शारीरिक दृष्ट्या  होणारी धावपळ  आणि दगदग याला काही मर्यादा येत आहेत. आमच्याकडे या जबाबदाऱ्या सोपवून  आपण आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच अजित पवार यांची भूमिका होती. त्यामुळे आता अजित पवार यांची जागा रोहित पवार घेऊ पाहत आहेत. त्यांना जयंत पाटील साहेब अडचण ठरत आहेत, म्हणून त्यांना देखील पक्षातून बाहेर काढला पाहिजे, पक्ष ताब्यात मिळावा, असे प्रयत्न सुरू आहे.

याबाबत सुनंदा पवार यांनी देखील सूचक वक्तव्य करून रोहित पवार यांना जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.  एकंदरीत पक्षातील ही परिस्थिती पाहता  जयंत पाटील साहेबांचा हा एक प्रकारे अपमान आहे. मात्र मला याची देखील खात्री आहे की जयंत पाटील साहेब याचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम वाजवतील. अशी बोचरी टीका ही आमदार अमोल मिटकरी यांनी बोलताना केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link