Vidarbha Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. तर आगामी काळात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून (IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम कायम असल्याचा इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

हवामान विभागाचा’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने एकच दाणादान उडवली आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकरी आणि बाजार समितीलाही बसला आहे. तर आज 12 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 24 तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले

अकोला शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. तर पशू पक्षांनाही अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल वादळी वार्यांसह दमदार पाऊस झालाय. जोरदार वाऱ्यामूळे अकोट शहरातील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या परिसरातील एक मोठं झाड उन्मळून पडलयं. यावेळी या झाडावर निवारा असलेल्या शेकडो पोपटांचा दुर्देवी मृत्यू झालाय. पाऊस आणि वारा थांबल्यावर मृत पोपटांवर एकाच ठिकाणी दफन करण्यात आलंय. मात्र या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

अवकाळीनं हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडातील घास

गेल्या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अनेकांच्या शेतातील भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी धान मळणीसाठी धान कळपा शेतात कापून ठेवलेल्या असताना त्या अवकाळी पावसात सापडल्यानं आता पाण्याखाली आल्या आहेत. यामुळं धानाची नासाडी होण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी कापणीला आलेले भात पीक जोरदार वारा आणि पावसात सापडल्यानं जमीनदोस्त झालेलं आहे. अगदी काही दिवसात निघालेल्या भात पिकाची विक्री करून स्वतःवर असलेलं कर्ज फेडण्याचं स्वप्न बघत असतानाच आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेराल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुरता हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..Source link