अमरावती : तब्बल चारवेळा विधानसभेचा आखाडा गाजविणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंची विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अतिशय सकारात्मक असल्याचं सांगितलं जातंय. ही निवडणूक पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये होणार आहे. 

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून विधानसभेत पराभूत झाल्यानंतर बच्चू कडूंची शिक्षक मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. बच्चू कडूंनी 2004, 2009, 2014 आणि 2019 असे तब्बल चार वेळा अचलपुरातून विजय मिळवला होता. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अचलपुरातून भाजपाच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंचा 12,131 मतांनी पराभव केला. त्यानंतर आता बच्चू कडू डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

पुढच्या वर्षी विधान परिषदेची निवडणूक

सध्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व अपक्ष आमदार किरण सरनाईक करत आहेत. किरण सरनाईक यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. नुकत्याच अमरावतीमध्ये पार पडलेल्या प्रहार शिक्षक संघटनेच्या मेळाव्यात बच्चू कडू यांना शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून आग्रह करण्यात आला. त्याला बच्चू कडूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बच्चू कडूंचे स्पष्ट संकेत

‘एबीपी माझा शी बोलताना बच्चू कडूंनी अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक मतदारांचा समावेश आहे. बच्चू कडूंच्या शिक्षक मतदारसंघातील एंट्रीने अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चुरशीची आणि हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link