Chandrashekhar Bawankule :  आम्ही विधानसभा निवडणुकीला समोरे गेलो तेव्हा संकल्प केला होता. यामध्ये पाच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असं सांगितलं होतं असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. निवडणुकीवेळी संकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या, त्या गोष्टी पाच वर्षात आम्ही पूर्ण करु असे बावनकुळे म्हणाले. त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीही होती. आमचं सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असेही बावनकुळे म्हणाले. 

संकल्प पत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही

जेव्हा आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ तेव्हा आमच्या संकल्प पत्रामधील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही. जो वचननामा आम्ही जनतेला मतं घेताना दिला तो विकास आम्ही करु असेही बावनकुळे म्हणाले. आमचा संकल्पना नामा 100 टक्के आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करु. आमचं महायुतीचे सरकार संकल्प पूर्ण करेल असे बावनकुळे म्हणाले. 

अमित शाह हे तटकरेंच्या घरी जात असतील तर एकनाथ शिंदेंसह गोगावलेंनी नाराज होण्याचं कारण नाही

केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह यांनी महायुतीतील एका पक्षाच्या अध्यक्षाला वेळ दिला आहे. हे आमचे संस्कार असल्याचे वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. अमित शाह हे जर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या घरी जात असतील तर मंत्री भरत गोगावले, एकनाथ शिंदेंसह आम्ही नाराज होण्याच कारण नाही असे बावनकुळे म्हणाले. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्वच पक्षाच्या लोकांना निमंत्रण दिलं आहे. एकनाथ शिंदेंनांही निमंत्रण दिलं आहे. गोगावलेंना आणि मलाही निमंत्रण दिलं असल्याचे बावनकुळे म्हणाले.

कर्जमाफीच्या मुद्यावरुन प्रहार संघटना आक्रमक

सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं. यावरुनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, यामध्येसुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. 

महत्वाच्या बातम्या:

हिंदुत्व आमच्या DNA मध्येच, उद्धव ठाकरेंकडे औरंगजेब फॅन क्लबचे नेतृत्व, बावनकुळेंचा हल्लाबोल, म्हणाले, पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही 

अधिक पाहा..



Source link