Maharashtra Amravati Crime : अमरावती जिल्ह्यातील (Amravati District ) तिवसा शहरात भर दिवसा घडलेल्या एका सराफा व्यवसायिकाच्या हत्येने  (Murder) सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी नव्याने डोके वर काढत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तिवसा शहरातील सराफा व्यावसायिक असलेले संजय मांडळे यांची भरदिवसा अज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार चोरीच्या उद्देशातून घरी आलेल्या आरोपीने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. सदर घटनेचा तपास तिवसा पोलीस करत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे गुन्हेगारी विश्वात पोलिसांचा दबदबा कमी तर झाला नाही ना? अशी प्रतिकीय नागरिकांमध्ये उमटतांना दिसते आहे. 

घरात कुणी नसल्याचा घेतला फायदा 

अमरावतीच्या  (Amravati) तिवसा शहरातील रहिवासी असलेले संजय मांडळे हे पेशाने सराफा व्यावसायिक (Bullion Businessman) आहेत. सोमवार 27 नोव्हेंबरच्या दुपारी मृतक संजय मांडळे यांची पत्नी या डायलेसिस या आजाराच्या रुग्ण होत्या. त्यामुळे त्यांना सतत डायलेसिस करण्याकरिता अमरावती येथे घेऊन जावे लागते होते. सोमवारी सुद्धा त्यांचा मुलगा वैशाक हा आपल्या एका मित्रासह आईला अमरावती येथून घेऊन गेला होता. तर मुलगी ही मामाकडे होती. दरम्यान संजय मांडळे हे घरी एकटेच होते. या संधीचा फायदा घेत त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात पैसे आणि मौल्यवान दाग-दागिने चोरण्याचा प्रयत्न या आरोपींचा होता. दारम्याने या आरोपी आणि मृतक संजय मांडळे यांच्याशी सामना झाला आणि त्यातून या आरोपीने संजय मांडळे यांची निर्घुण हत्या केली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहे. 

सदर घटनेचा तपास तिवसा पोलिसांकडून सुरू असून पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रम साळी यांनी घटना स्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तिवसा पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार संजय मांडळे यांच्या घरी तब्बल 73 लाख सोन्याचे दागिने असल्याची कुणकुण या आरोपींना लागली असावी. त्याच दागिन्यांच्या चोरीसाठी आरोपींनी संजय मांडळे यांची निर्घृण हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येच्यांच दिवशी मृतक संजय मांडळे यांची पत्नी आणि मुलगा अमरावती वरुण सायंकाळी परत आले असता तेव्हा त्यांना संजय मांडळे हे रक्तात पडलेले आढळले. तसेच यावेळी घरातील दागिण्याची बॅग घरातून  गायब होती. सदर घटनेची माहिती संजय मांडळे यांच्या पत्नीने पोलिसांनी दिली असून पोलिसांनी या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link