मुंबई : स्वप्नांची नगरी मुंबई कोणाला पाहावीसी वाटणार नाही. अशाच मुंबईच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मुंबई प्रेमींसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता गारेगार प्रवासात मुंबईचे दर्शन (mumbai Tourist)  घेता येणार आहे.हा प्रवास इतका स्वस्त आहे की किंमत बघून तुम्ही तिकीट खरेदी कराल. नेमकी ही कोणती बस सेवा आहे व मुंबईचे दर्शन करण्याचे तिकीट किती आहे ते जाणून घेऊयात. 

मुंबईला दररोज असंख्य पर्यटक (mumbai Tourist) भेट देत असतात. या पर्यटकांना मुंबईच्या विविध ठिकाणांना भेट देण्याची इच्छा असते.मात्र असंख्य ठिकाणे दुर दुर असल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे पर्यटकांना बस, टॅ्क्सी, रेल्वे आणि विविध प्रवासी गाड्यांचा लाभ घेऊन पर्यटनस्थळी पोहोचावे लागते. या प्रवासात अर्धा दिवस निघून जातो. त्यामुळे वेळेची बचत आणि प्रवास सुखकर व पर्यटकांना मुंबईचे दर्शन अधिक सुलभ होण्यासाठी आता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने एक हॉप-ऑन-हॉप-ऑफ (hop on-hop off) (हो-हो) (Ho-Ho AC bus)  एसी बस सुविधा सुरू केली आहे. या एसी बस सेवेने पर्यटकांचे मुंबई दर्शन गारेगार होणार आहे. 

बेस्ट (BEST) आपला ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे.या निमित्त व मुंबई शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी सोमवारपासून  हो-हो एसी बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बस भाडे किती?
बेस्टचे  (BEST) महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले की,मुंबई दर्शन घडवणाऱ्या या बसच्या तिकीटाची किंमत 150 रूपये आहे. हे तिकीट खरेदी करून तुम्ही दिलेल्या थांब्यांवरून मुंबई दर्शन बस पकडून बसचा प्रवास करू शकता. या बससेवेमुळे पर्यटकांचे मुंबई दर्शन होणार  आहे. पर्यटकांसाठी हा प्रवास अधिक आनंददायी आणि सोयीस्कर असणार आहे.  

‘या’ मार्गावर धावतेय?
सध्या हो-हो बस (Ho-Ho AC bus) गेटवे ऑफ इंडिया ते जुहू चौपाटी या दरम्यानच्या मार्गावर धावत आहे. या बसेस अनेक पर्यटन स्थळांवर थांबतात. तर आता नवीन हो-हो बस  (Ho-Ho AC bus) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावणार असून तुम्हाला शहरातील अनेक पर्यटन थांब्यांवर घेऊन जाणार आहे. 

डबल डेकर बसेस धावणार
लोकेश चंद्र यांनी पुढे सांगितले की, लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस देखील सुरू होणार आहेत. बेस्टच्या 50 टक्के बसेस 2023 च्या अखेरीस इलेक्ट्रिक असतील तर इतर बस 2026 च्या अखेरीस इलेक्ट्रिक असतील. देशातील बहुतांश बस बेस्टच्या अंतर्गत धावतात, भविष्यातही आमच्याकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक बसेस असतील,असा मानस त्यांनी व्यक्त केला.  

दरम्यान बेस्टच्या या हो-हो बस सेवेने (Ho-Ho AC bus) पर्यटकांचे मुंबई दर्शन आणखीण सुखकर होणार आहे. गारेगार प्रवासात मुंबईकरांना मुंबईच संपुर्ण दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना या बेस्ट सेवेचा चांगला फायदा होणार आहे. 





Source link