Anjali Damania PC on Ashok Kharat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातला मोठं करण्यामागे अधिकारी, राजकारणी होते असं सांगत यादीच वाचून दाखवली आहे. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर आणि त्यांचं सर्व कुटुंबीय अशोक खरातच्या संपर्कात होता असा खुलासा केला आहे. अशोक खरातशी फोनवरुन सर्वाधिक संपर्क साधणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर असून एक कॅाल तर 22 मिनिटांचा आहे असाही गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एका नेत्याचं नाव समोर आल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचं सांगितलं आहे.
खरातला मोठे करणारे राजकारणी, अधिकारी
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, “अशोक खरातला मोठे करणारे राजकारणी, अधिकारी होते. त्यांच्या दिमतील सगळे होते. त्यातील काही राजकारण्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. काही राजकारणी संधीसाधूपणा, किंवा साध्य करण्यास गेले असतील”.
यादीच वाचून दाखवली
यावेळी अंजली दमानिया यांनी यादीच वाचून दाखवली ज्यामध्ये, नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, त्यांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्ररमधून निवडणुकीला उभे राहिलेले उदय सांगळे, विधानपरिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, भुसे यांचे पीए रामदास खेडकर, विखे पाटलांचे ओएसडी खताडे, सुनील तटकरे यांचा उल्लेख होता. दीपक केसरकर यांनी 19 कॉल केले होते असं त्यांनी सांगितलं.
‘जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते’
राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते असाही दावा त्यांनी केला आहे. त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा नव्हती अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की, “जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे नाव वाचून दु:ख झालं. त्यांना अशा बाबाकडे भविष्य विचारण्यासाठी कोण घेऊन गेलं माहिती नाही. मला ती व्यक्ती आतापर्यंत चांगली वाटायची”.
रूपाली चाकणकर यांनी 177 कॅाल केले
चाकणकांनी फेसबुक पोस्ट केली असून, मीडिया ट्रायल सुरु असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडेंप्रमाणे मीडियातून गायब आहेत असं त्या म्हणाल्या. “चाकणकर कुटुंबियांतील सर्वांनी फोनवरुन खरातशी संपर्क साधला होता. रुपाली चाकणकर, मुलगा सोहम, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल्ल, संकेत या सर्वांचे कॉल यादीत सापडलले आहेत. 1 एप्रिल ते 17 मार्चच्या कॉल डेटानुसार, रूपाली चाकणकर यांनी 177 कॅाल केले. त्यातल इनकमिंग 119 व आऊटगोंईंग 58 आहेत. 17 मार्चला अशोक खरातचा फोन बंद होईपर्यंत बोलत होत्या. एक कॅाल तर 22 मिनिटांचा आहे. नेमक्या कसल्या गप्पा मारत होत्या?,” अशी विचारणा अंजली दमानियांनी केली आहे.
तिसऱ्या नंबरवर दिपक लोंढे
“टॅाप दहा फोन नंबर ज्यांनी सर्वात जास्त वेळ खरातशी बोलले त्यात त्याची मुलगी तृप्ती पहिल्या नंबरवर व दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहेत. त्या 33 हजार 727 सेकंद बोलल्या. जर काही काम नव्हतं, संस्थेचं काम करत होता तर तुम्ही तर टॉपच्या दुसऱ्या क्रमांकावर कशा? 30 सेकंदाचे कॉल समजू शकले असते. नंतर तिसऱ्या नंबरवर दिपक लोंढे, मग पत्नी कल्पना आहे. दिपक लोंढे केसरकरांचे जवळचे आहेत. ज्यांचे 189 कॅाल आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.