नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल केल्यानंतर विरोधकांनी 2023च्या महिला आरक्षण विधेयकाचा धागा पकडला आहे. 2023 मध्ये मंजूर झालेला कायदा अंमलात का आणला नाही? असा सवाल आता विरोधकांनी केला आहे. केंद्र सरकारने महिला आरक्षण कायदा म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले होते, दरम्यान या विधेयकाला विरोधकांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र याच विधेयकावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आता कोंडीत पडकलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सध्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. राजकारणामध्ये महिला आरक्षणाच्या विधेयक नामंजूर केल्यानंतर आता याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 18 एप्रिल रोजी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांना संबोधित केले होते. त्यानंतर आता विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणे साधले आहेत. 

हेही वाचा – महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकारण तापलं! विरोधकांचा मोदींवर निशाणा

2023च्या नारीशक्ती विधेयकावरून सवाल – नाना पटोले

2023च्या नारीशक्ती विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला होता, मात्र यावेळी महिला आरक्षण विधेयकाच्या आडून सत्ताधा-यांचा दुसराच डाव होता… 2023 ला मंजूर झालेलं आरक्षण 2024च्या आधी लागू करणार होते, त्याचं काय झाल? असा सवाल काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला आहे. महिला आरक्षण विधेयकावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपला काही सवाल केले आहेत, तामिळनाडू, पश्चिम बंगलाच्या निवडणुकीआधी भाजपनं महिला आरक्षणाचा ड्रामा केल्याची टीका दमानियांनी केलीय.

महिला आरक्षणाच्या विधेयकावरून चांगलंच राजकारण पेटलं आहे, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केल्यानंतर विरोधकांनी 2023च्या नारीशक्ती विधेयकाचा मुद्दा पुढे आणला, आणि याच मुद्यावरून विरोधक आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. नाना पटोले हे असेही म्हणाले की जेव्हा मोदी बोलत होते तेव्हा मी मोबाईलवर पाहत होतो. अनेक लोक त्यांना फेकू आणि मी बोलू शकत नाही असे म्हणत आहेत पण ते त्यांच्यावर टीका केली जात आहे. 

नाना पटोले यांचा दावा 

भाषण करताना नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 10 टक्के महिलांना तिकीट दिलं तर काँग्रेसने 13% महिलांना तिकीट दिले होते. पुढे ते म्हणाले की आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि भाजपाला महिला नको आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp