मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून गेल्या 4 महिन्यांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  या योजनेमधून 6 कोटी रुपये 40 लाख रुपयांची जवळपास 1200 हून अधिक रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते. मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतून या वैद्यकीय कक्षेची सुरुवात करण्यात आली आहे. चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आहेत.

विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे याआधी या योजनेत मोजक्याच आजारांचा समावेश होता. मात्र आता खर्चिक आजारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधितून 4 महिन्यात 1 हजार 62 रुग्णांना 6 कोटी 40 लाखांची मदत देण्यात आली आहे. जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असं आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन 4 महिन्यातच 1 हजार 62 रुग्णांना 6 कोटी 40 लाखांची मदत देण्यात आली आहे.

चांगले उपचार मिळणं हे  उद्दीष्ट 
सर्वांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त रुग्णांना मदत देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायता कक्ष वेगाने कामाला लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी mahacmmrf.com हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे. तसेच रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नवीन आजारांचा समावेश
मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी 3 लाख रुपये या योजनेतून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थिक मदत देण्यासाठी पाच प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. यात ह्रदय शस्त्रक्रिया, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोनमॅरो आणि ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 2 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. गुडघा किंवा खुबा बदल शस्त्रक्रिया, मेंदू रोग, कर्करोग, लहान बालकांचे आजार, अपघातातील शस्त्रक्रिया आदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. तर डायलिसिस, केमोथेरपी, जळीत रुग्ण, अस्थिबंधन आदींसाठी 50 हजार रुपये मदत मिळेल. या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे 25 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.

 योजणेच्या या आहेत पात्रता
1) 1.60लाखांपेक्षा कमी वार्षिक ऊत्पन्न असलेली कुटुंबे
2) प्रत्यारोपणासारख्या नियेजित शस्रक्रियांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी मदतीसाठी अर्ज करणे आवश्यक
3) आपातकालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यानंतरही अर्ज करता येतो.

30 खाटांच्या रुग्णालयांना मदतनिधी
वैद्यकीय उपचारासाठी आपण कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत की नाही याबाबत आनेकांना माहित नसते.त्यामुले अधिकाधिक रुग्णालये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये समाविष्ट केल्यास अनेकांना आर्थिक मदत करता येईल, त्यानुसार 30 खाटा असलेल्या रुग्णालयाचा यात समावेश केला असल्याची महिती 
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.

या शिवायच्या अन्य आजारांसाठी आवश्यकतेप्रमाणे 25 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. वरील निकषात कोणते रुग्ण बसू शकतात आणि त्यांना नेमकी किती मदत दिली जावी हे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली असून ती याबाबत निर्णय घेईल असे चिवटे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाला दुप्पट निधी देण्याची माझी भूमिका मुख्यमंत्री शिंदे म्हाणालेत. याशिवाय महात्मा फुले जन आरोग्य आणि  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून जास्तीतजास्त रुग्णांना वेळेत आणि चांगले उपचार मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





Source link