Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर झाली आहे. भाजपने 5 जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. विधानपरिषद पोटनिवडणूक प्रज्ञा सातव यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. अद्याप कोणत्याच पक्षाने यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे विवेक कोल्हे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भाजपच्या यादीची  वैशिष्ट्ये पाहिली असता विभागनिहाय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विधान परिषदेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विभागीय समतोल साधण्यात आल्याचे दिसून येत आहे.  सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.

 निवृत्त आमदारांचा पत्ता कट झाला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारत संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार  निवृत्त होत आहेत.  

एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर दिली असताना या प्रकरणात नवीन घडामोड समोर आली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राणा आणि कडू यांच्यात काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यानरवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.  बच्चू कडून यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी रवी राणा मदत करणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीचा संभ्रम अद्याप कायम आहे. कारण विधानपरिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस बाकी आहेत. असं असताना महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेवर जावं असा मविआ नेत्यांचा आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे.. तर ठाकरेंच्या मनधरणीसाठी शिवसेना UBT नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे संजय राऊत म्हणतायत की पेढे मिळणार, मात्र हे पेढे देणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

 संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला आठ जागा मिळाल्या.  तर, विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला येणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांकडून घेण्यात आसी आहे. असे  असले तरी, शिवसेनेच्या नेतृत्वाकडून दहावा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी  एकीकडे काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यात आला आहे, तर दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’च्या माध्यमातून राष्ट्रवादी (SP) पक्षाच्या मतांमध्ये फूट पाडण्याची खेळीही खेळण्यात येणार असल्याचे समजतंय. मात्र शिंदेंच्या या खेळीमुळे ठाकरेंना फटका बसणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. 

राज्यातल्या राजकारणात पुन्हा हालचाल वाढलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नंदनवन निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे नेते, उपनेते, महत्त्वाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणूक हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.. त्याचबरोबर पक्षात सुरू असलेली नाराजी, काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.  शिंदे स्वतः यावर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागल आहे.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp