Shocking Letter To Governor of Maharashtra: स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे आणि व्हिडिओ जाहीर करा! अशी धक्कादायक मागणी माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Saoji) यांनी केली आहे. सुबोध सावजी यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना यासंदर्भात एक पत्र पाठवलं असून या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्रीपद भूषवलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर-लोणार मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले सुबोध सावजी अडचणीत आले आहेत.
पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले सुबोध सावजी सध्या स्वतंत्रपणे माजी मंत्री म्हणून सक्रिय असून त्यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. मात्र आता त्यांनी मर्यादा ओलांडणारी मागणी करणारं पत्र 16 एप्रिल रोजी राज्यपालांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हटलंय? पत्राचा विषय काय आहे? जाणून घेऊयात…
विषय : राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करुन घेणाऱ्या महिलांवा पोलीस केसेस दाखल करुन यांची नावे, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण शासनाने समाजासमोर आणावीत
महोदय,
बलात्कार दोन प्रकारचे आहेत. एक जबरदस्ती केलेला बलात्कार, दुसरा महिलेने स्वत:हून करवून घेतलेला बलात्कार. जबरदस्ती केलेला बलात्कार यामध्ये महिलांची नावं गुतिप राहिलीच पाहिजेत. हे सामाजाकरीता चांगले आहे.
ज्या महिलांनी स्वार्थाकरीता, पैसे कमविण्याकरीता बलात्कार करवून घेतले अशा व्याभिचारी महिला समाजाला कलंक आहेत.
अशा महिलांना समाजासमोर आणणे हे माझे व राज्यातील जनतेचे स्पष्ट मत आङे. अशा महिला जनतेसमोर उघड झाल्यास इतर महिला अशा वागणार नाहीत. स्वार्थाकरीता, पैशाकरीता बलात्कार करवून घेण्याचे प्रकार कमी होतील. भोंदू बाबा, संत, महात्वे, महाठग, आर्थिक लाभाच्या नादी लागून अनेक महिला निरनिराळ्या ठिकाणी जावून बलात्कार करवून घेतात. य बलात्कारीत महिलांची नावे जाहीर करायचे नाही, असा शासन निर्णय़ आहे.
या शासन निर्णयाने अनेक महाठग व महिलांना दुष्कर्म करण्याकरीता पैश्यांच्या अमिषाने जागा भाड्याने देणे यामध्ये समाजातील अनेक गैरवर्तन करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे.
सध्य परिस्थितीत राज्यात नाशिक व इतर भागात महाठग अशोक खरात याच्यासारख्याच्याच सानिध्यात श्रीमंत, सुक्षीशित, राजकारणी महिला येवून यांनी स्वत:वर बलात्कार करवून घेतले.
बलात्कार करुवून घेणाऱ्या महिलांची नाव उघड करायवची नाही, त्यांचे व्हिडीओ व्हायरल करावयाचे नाही असा शासन निर्णय आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. ज्या महिला स्वत:हून बलात्कार करवून घेण्यास गेल्या त्यामुळे समाजामध्ये अनैतिकतेचे वातावरण होत आहे. महिला स्वत:हून बलात्कार करवून घेण्यास गेल्यामुळे भोंदू बाबा, संत, महात्मे बलात्कार करणाऱ्यांस मोठ्या प्रमाणात शासकीय निर्णयाचा आश्रय मिळतो.
माजी राज्यातील जनतेसह आपण अशी विनंती आहे की ज्या महिला स्वत:हून निरनिराळ्या प्रकारे बलात्कार करवून घेतात त्यांची नावं, फोटो असल्यास व्हिडीओ चित्रीकरण हे सर्व शासनाने जाहीर करावे.
आपण याबाबत शासन निर्देशीत करावे हिच अपेक्षा. कार्यवाही कळवावी.


या प्रकरणावरुन शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंबरोबरच समाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनीही नाराजी व्यक्त केली आहे.