Mumbai Ghatkopar hoarding collaps​ : मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते.  कोसळलेलं होर्डिंग हे अडीचशे टनाचं बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेत अनेक निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला आहे. याच दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू जाला आहे. जिथे ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाहून हा टॅक्सी चालक 4 फूट मागे असता तर त्याचा जीव वाचला असता. 

मी घरी येतोय.. आणि शेवटी त्यांचा मृतदेहच घरी आला

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत नालासोपा-यातल्या टॅक्सी चालकाचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. 51 वर्षांचे सतीश बहाद्दर सिंह एक भाडं मारण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबईतलं भाडं संपवून ते ठाण्यामार्गे नालासोपा-याला येणार होते. मात्र, येताना वाटेत टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी ते घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर आले आणि तिथेच काळाने घात केला. 

जेव्हा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं तेव्हा सतीश सिंह यांची टॅक्सी शेवटी उभी होती. जर 4 फूट अंतरानेही त्यांची टॅक्सी पंपापासून लांब असती तरी त्यांचा जीव वाचला असता. मात्र होर्डिंग कोसळल्यानंतर त्यांच्या टॅक्सीचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला. दुपारी तीनच्या सुमारास सतीश सिंह यांचं कुटुंबियांसोबत फोनवरुन अखेरचं बोलणं झालं होतं. घरी येत असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं. मात्र हे त्यांचं अखेरचं बोलणं ठरलं.  त्यांच्या पश्चात पत्नी शीला सिंह, मुलगा शुभम सिंह 29, शिवम सिंह 24 ,सत्यम सिंह, मुलगी सुप्रिया सिंह असा परिवार आहे.

होर्डिंग दुर्घटनेमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे संबंधित प्रशासनाने स्ट्रक्चरल ऑडिट केलं असतं तर अशी दुर्घटना झाली नसती. अशा बेकायदा व परवानगी असलेल्या होल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे तसेच मृतांच्या नातेवाईकांना सरकारने योग्य ती मदत करावी अशी मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे.

घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग क्रेन्सच्या साहाय्यानं काढण्याचा एनडीआरएफचा प्रयत्न अयशस्वी ठरला. होर्डिंग्सचं वजन जास्त असल्यानं ते मध्येच तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांनी सरळ हँडकटरनी होर्डिंग काढायला सुरुवात केलीय. आधी 2 क्रेन्सच्या साहाय्यानं हे होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न एनडीआरएफनं केला, मात्र त्यात यश आलं नाही.. पेट्रोल पंपावर हे होर्डिंग असल्यामुळे याठिकाणी एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या साहाय्यानं होर्डिंग तोडता येत नाहीये.  त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. 

 

Source link