Raj Thackeray  Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, यावेळी दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेचं कारण आहे, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली टाळी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी आमच्यातील भांडणं दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचं दोन्ही ठाकरेंनी म्हटलंय. 

ठाकरे बंधू एकत्र येणार अशी  सुरु झालेली चर्चा नेहमीसारखी हवा तर नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारण याआधी देखील मनसे आणि शिवसेनेची युतीसंदर्भात चर्चा झाली मात्र, काही कारणांवरुन ही युती फिस्कटली होती.

ठाकरे बंधूमध्ये युतीची चर्चा कधीकधी झाली?

27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरेंनी केली. 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर ‘सामना’मधून उद्धव ठाकरेंची टाळी युतीच्या चर्चा वृत्तपत्रांमधून होत नसतात म्हणत राज ठाकरेंनी इन्कार केला होता.  2014 विधानसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन केला होता. असा मनसे नेत्यांचा दावा आहे.  

2017 मध्ये महापालिका निवडणुकीवेळीही युतीची चर्चा रंगली होती.   श्रीधर पाटणकरांशी चर्चाही सुरू झाल्याचा मनसेचा दावा पुढं ही चर्चा अचानक थांबली. 2017मध्ये युतीची चर्चा झाली होती, नंतर उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाही.  2014 विधानसभेपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये युतीची चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी दोन्ही पक्षांमध्ये युती झाली नाही. यावर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी आपआपली मतंही व्यक्त केली आहेत

राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापन केली. त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चर्चा मागील 20 वर्षापासून सुरुय. मात्र, अजूनही दोन्ही बंधू एकत्र आले नाहीत. मात्र, आता राज ठाकरेंनी टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय.  त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? की नेहमीसारखी यावेळी देखील चर्चेची हवाच आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp