Akola : अकोल्यामध्ये अफझलखानाचा वध दाखवल्यानं मागायला लागली माफी, होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रकार
अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफझलखानाच्या वधाचं दृष्य साकारणार्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडलाय. अफझलखानाच्या वधाचं दृष्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखानल्याचा आरोप एका विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होताय. त्यानंतर नाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलंय. दरम्यान, अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आक्रमक होत दोषींवर कारवाईची मागणी केलीये. Source link