<p>अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. &nbsp;रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीनं एक अनोखं आंदोलन केलंय. काळेगाव ते तेल्हारा रस्त्यावर रात्री वंचितच्या कार्यकर्त्यांनी ‘खड्डा तिथे दिवा’ हे आंदोलन केलं. तसंच आमदार प्रकाश भारसाकळे यांचा उलटा फोटो लावत कार्यकर्त्यांनी त्या फोटोपुढेही दिवे लावले. दरम्यान आंदोलकांनी सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.&nbsp;&nbsp;</p>Source link