Amravati Lok Sabha Election 2024होळीच्या (Holi 2024) पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)हे वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतात. अशातच यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपल्या घराच्या भिंतीवर अनेक ज्वलंत मुद्दे लिहत शासनाचे लक्ष वेधले आहे. निवडणूक आली मुद्द्यावर बोला असे लिहत बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या आहे. गेल्या वर्षी बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेची शाळा रंगावत आपले लक्ष वेधले होते. मात्र यंदा बच्चू कडू यांनी स्वत: आपल्या घरावर विविध मागण्या लिहून आपल्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांचा ‘प्रहार’

या विषयी भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, अशा प्रकारचे संदेश खऱ्या अर्थाने प्रत्येक नेत्याने आपल्या घरावर लिहिले पाहिजे. ज्यांचे मत आम्ही घेतो त्या मतदाराला असे वाऱ्यावर कोणीही सोडू नये. जातीपातीचे मुद्दे समोर करून त्यावर मत मिळवणारी एक जमात आता निर्माण व्हायला लागली आहे. धर्माचे जातीचे झेंडे हातात घेऊन मूळ मुद्द्यापासून आपल्याला दूर ठेवल्या जात आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय की निवडणूक आली मुद्द्यावर बोला.

यात मुख्य मुद्दे म्हणजे स्वामीनाथन आयोग हा गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने स्वीकारला नाही तसाच तो भाजपने देखील स्वीकारला नाही. त्यामुळे आता हा आयोग  पूर्णता स्वीकारावा. कारण 50 टक्के नफा धरून भाव  कळायला पाहिजे. असे नसेल होत तर शेतकऱ्यांची पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व मजुरीची कामे मनरेगा मधून झाली पाहिजे, अशा अनेक मागण्या आम्ही केल्या असून सरकारने त्यावर बोलायला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. 

निवडणूक आली मुद्यावर बोला! 

राज्यात घरकुलाचे प्रश्न देखील तसेच प्रलंबित आहे. तर दुसरीकडे राज्यात सातत्याने पेपर फुटीच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे पोरं ज्यावेळी पेपर द्यायला जातात तेव्हा पेपर फुटी होतं असते. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर कायदा करून युवा वर्गासाठी चांगले धोरण तयार केले पाहिजे. हल्ली दिव्यांगाना देखील अनेक अडीअडचणींना समोर जावे लागत आहे. त्यांना तीन हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावा. सोबतच केंद्र आणि राज्याच्या निधीमध्ये पाच टक्के वाटा हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला पाहिजे. सोबतच शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांचे स्वातंत्र्य वित्त महामंडळ तयार करावे, इत्यादी अनेक मुद्दे घेऊन आम्ही सरकारकडे मागणी करत असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link