मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी इथली घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात.

वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात.

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.

कसा असेल पाऊस

या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलं आहे.

पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.

तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे.

चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे. 

कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आलं आहे. 

पीक पाण्याचा नियोजन आणि भाकीत पुढील प्रमाणे

ज्वारी सर्वसाधारण असल्याचं भाकित सांगण्यात आलंय.

तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल.

यंदा तीळ चांगला असेल. 

एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल

बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल. 

जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. 

गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल.

हरभरा चांगल पिक मात्र भाव निश्चित नाही. 

राजकीय भाकित नाही

 भेंडवळ घटमांडणीमध्ये यावर्षी पीक पाण्याचे भाकीत आचारसंहितेमुळे राजकीय भाकीत स्थगित करण्यात आलं होतं. 





Source link