निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात

निराशाजनक बातमी! 26 जानेवारीप्रमाणे 2025 मध्ये 'या' हक्काच्या सुट्ट्याही रविवारीच आल्यात


Public Holidays On Sunday: आज देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी दिल्लीतील कर्तव्यपथापासून ते खेडेगावांमधील शाळांमध्येही ध्वजारोहण करुन हा राष्ट्रीय सण साजरा केला जात आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे यंदा 26 जानेवारी (26 January) रविवारी आल्याने एक हक्काची सुट्टी गेल्याची भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे. सामान्यपणे आठवड्यातील मधल्या वारी 26 जानेवारी असेल तर राष्ट्रीय सण म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यंदा प्रजासत्ताक दिन रविवारी आल्याने एका हक्काच्या सुट्टीला कात्री लागल्याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. मात्र ही केवळ वर्षाची सुरुवात असून यंदा वर्षभरामध्ये अशा अनेक हक्काच्या सुट्ट्या रविवारी आल्याचं दिसत आहे. या सुट्ट्या कोणत्या आणि कधीकधी अशाप्रकारेच सार्वजनिक सुट्ट्या रविवारी आणि शनिवारी आल्यात पाहूयात…

राज्य सरकारनेच जाहीर केली आहे सुट्ट्यांची यादी

महाराष्ट्रामध्ये 4 डिसेंबर 2024 रोजी 2025 च्या सार्वजनिक सुट्ट्या कशा असतील यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. राज्य सरकारने 24 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. या सुट्ट्या सरकारी कार्यालयांबरोबरच सार्वजनिक उपक्रम क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही जागू असतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीशीसंबंधित कामगारांनाही या 24 सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. मात्र या सुट्टयांपैकी स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच अन्य तीन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. तर एक सुट्टी शनिवारी येत असल्याने पाच दिवस काम करणाऱ्यांना एकूण चार सुट्ट्यांचा फटका बसला आहे.

रविवारी येणाऱ्या सुट्ट्या कोणत्या

26 जानेवारीप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये 30 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टीही रविवारीच आली आहे. या शिवाय त्याच्या पुढचा रविवार म्हणजेच राम नवमीही (6 एप्रिल) रविवारीच आली आहे. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये 6 तारखेला येणारी मोहरमची सुट्टीही रविवारीच आली आहे. म्हणजेच 30 मार्च, 6 एप्रिल आणि 6 जुलैची सुट्टी रविवारी आली आहे.

शनिवारी आणि सोमवारी आलेल्या सुट्ट्या कोणत्या?

7 जून रोजी बकरी ईदची सुट्टी आहे. मात्र ही सुट्टी शनिवारी आली आहे. तसेच यंदाच्या वर्षी रविवारला लागूनही काही सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ज्यामध्ये 31 मार्च (रमजान-ईद), 14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध पौर्णिमा (12 मे) या सुट्ट्या सोमवारी आल्या आहेत. 

लाँग विकेंड देणाऱ्या सुट्ट्या

सोमवारप्रमाणेच यंदाच्या वर्षी शुक्रवारीही बऱ्याच सुट्ट्या आल्या आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग विकेंड मिळण्याची संधी असलेल्या या सुट्ट्या पुढील प्रमाणे : 14 मार्च (होळी, दुसरा दिवस), गुड फ्रायडे (18 एप्रिल), स्वातंत्र्य दिन तसेच पारसी नववर्ष (15 ऑगस्ट), ईद-ए-मिलाद (5 सप्टेंबर)





Source link

पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर


Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पद्म पुरस्काराने सम्नान केला जातो. पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश आहे.  दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 49  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. 

राष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार 2024’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील  शशिकांत रामकृष्ण गजबे  यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार  दादाराव गोविंदराव पवार,  ज्ञानेश्वर मुकुंदराव भेदोडकर, यांना जाहीर करण्यात आले.  महाराष्ट्रातील तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्यामध्ये साहित्यिक मारुती चितमपल्ली, वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये मोठं योगदान असणारे चैत्राम पवार तसेच प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे.

देशातील 49 नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यातील 17  नागरीकास ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’     जाहीर करण्यात आला. यामध्ये पाच व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. देशातील 09 जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले असून एका व्यक्तींस मरणोपरांत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण 23 जणांना जाहीर झाले आहेत. 

महाराष्ट्राच्या नागपूर मधून डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. होमिओपॅथीच्या क्षेत्रात समर्पण भावनेने केलेली रुग्णसेवा, रुग्णसेवा करताना जपलेली नैतिक मूल्ये, समाज आणि रुग्णांप्रति असलेली आस्था व जबाबदारीची ठेवलेली जाणीव आदी बाबी विचारात घेऊन डॉ. विलास डांगरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हरिमन शर्मा, जुम्दे योमगम गॅमलिन, जॉयनाचरण बथारी, नरेन गुरुंग, विलास डांगरे, सैखा एझ अल सबा, निर्मला देवी, भीम सिंग भावेश, राधा बहन भट्ट, सुरेश सोनी, पंडी राम मानवी, जोनास मासेट्टी, जगदीश जोशिला, हरविंदर सिंग, भेरू सिंह चौहान, वेंकप्पा अंबाजी सुगतकर, पी दच्चनामूर्ती,  निरजा भाटला, मारुती भुजंगराव चितमपल्ली, भीमव्वा दोड्डाबलप्पा सिल्कायतारा, सॅली होळकर, गोकुळ चंद्र दास, चैत्राम पवार  यांना हा पुसस्कार जाहीर झाला आहे.

 





Source link

'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर…'

'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर…'



छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे



Source link

एसटीचा प्रवास महागला! महाडामंडळाचा भाडेवाढीचा निर्णय, जाणून घ्या काय आहेत नवीन दर

एसटीचा प्रवास महागला! महाडामंडळाचा भाडेवाढीचा निर्णय, जाणून घ्या काय आहेत नवीन दर


पुढील
बातमी

मुंबई ते पुणे प्रवास 6 किमीने कमी होणार; सह्याद्रीच्या डोंगररागातून जाणार रस्ता





Source link

उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'मला सूड….'

उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'मला सूड….'


Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण स्वबळावर लढावं असं मत मांडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना नादी लागू नका असा इशारा दिला आहे. “जास्त आमच्या नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तितके वळ घेऊन दिल्लीला जाल,” अशा शब्दांत त्यांनी अमित शाह यांना सुनावलं आहे. 

“सगळ्यांचं मत आहे की एकटे लढा. तुमची तयारी झाली आहे याची खात्री पटल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन. पण यावेळी मला सूड हवा आहे. जो महाराष्ट्राच्या पाठीत, कुशीवर वार करतो तो गद्दार आणि त्याचा वरदहस्त महाराष्ट्रात दिसता कामा नये. वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन,” असं सांगत उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. 

अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा

 

“घराघरात त्यांनी प्रचार केला की मी हिंदुत्व सोडले. बाबरी पाडली याबद्दल वाजपेयी,अडवाणींनी माफी मागितली होती. नवाज शरीफांच्या बर्थडेचा केक मोदी तुम्ही खायला गेला होता. अमित शाहांना आवाहन आहे की भाजपाच्या झेंड्यातील हिरवा काढा मग. भाजप आरएसएस फक्त काड्या लावते. दंगली पेटवून पळायचे, बाबरी पाडली पण आम्ही नाही त्यातले बोलले,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मी हारणारा नाहीय. मी मैदान सोडेन तर जिंकून सोडेन असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘अमित शाह यांचा समाचार घेणार’

“निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आपण भेटत आहोत. हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आपण षणमुखानंद हॉलमध्ये करणार होतो. पण दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला तो मला पटला नाही. मधे अब्दाली म्हणजे अमित शाह इथे येऊन गेले. त्यांनी महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे असं म्हटलं. अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

“अमित शाह यांचा समाचार घेतो. उद्या परत येणार आहेत. काल काय बोलले त्याचा आज आणि उद्या काय बोलतील त्याचा परवा समाचार घेणार. पण समाचार घेणार, मी नाही सोडत. मिठी मारु तर प्रेमाने मारु, पण पाठीत वार केल्यावर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे,” असा इशारा त्यांनी दिला. 

 





Source link

श्री शंभो: शिवजातस्य… पिंपळाच्या पानावर लिहिलेली शंभूराजेंची राजमुद्रा, मराठीत अर्थ समजून घ्या!

श्री शंभो: शिवजातस्य… पिंपळाच्या पानावर लिहिलेली शंभूराजेंची राजमुद्रा, मराठीत अर्थ समजून घ्या!


Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मी मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शंभूराजे नऊ वर्ष स्वराज्याचे छत्रपती म्हणून होते. या काळात संभाजी महाराजांचीही स्वतंत्र राजमुद्रा होती. पण अनेकांना राजमुद्रा आणि त्याचा अर्थ माहिती नाहीये? आज या निमित्ताने जाणून घेऊया. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक करण्यात आला.  1680 साली शिवरायांचे निधन झाले त्यानंतर एक 1681 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ते राज्यकारभार पाहू लागले. पण नवीन राज्य चालवण्यासाठी नवी राजमुद्रा लागते. संभाजी महाराज यांनी नवी राजमुद्रा तयार केली. संस्कृत भाषेत राजमुद्रा असून पिंपळाच्या पानावर आहे. त्यावर 16 बुरुज आहेत. 

राजमुद्रा काय आहे?

”श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।”

राजमुद्रेचा अर्थ काय आहे?

राजमुद्रेचा मराठीत अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.

याच राजमुद्रेच्या आधारावर संभाजी महाराजांचा राज्यकारभार चालवला होता. तसंच, शिवाजी महाराजांनी जशी राज्यात स्वतंत्र नाणी पाडली त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनीदेखील राज्यभिषेकानंतर स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी आणलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे म्हटलं जातं. 

शिवाजी महाराजांची राजमुद्रा काय होती. 

शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. 1646 मध्ये पहिल्यांदा या राजमुद्रेचा वापर करण्यात आला असं अभ्यासकांचे मत आहे. तसंच, 1680 पर्यंत या राजमुद्रेचा वापर केला जायचा. 

राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर

”प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता॥
साहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥”

मराठी अर्थ

प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp