by Hansraj Agrawal | Mar 4, 2025 | Trending News
Pune Swargate Rape Case: पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. या प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पोलिस तपासादरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. आरोपी खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे.
26 फेब्रुवारी रोजी पुण्याच्या स्वारगेट बस डेपो मध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. बलात्कारानंतर आरोपी दत्ता गाडे हा फरार झाला होता. पोलिसांनी 77 तासानंतर आरोपीला त्याच्या गुनाट या गावातुन अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर या प्ररणात रोज नविन अपडेट समोर येत आहे. पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला गेला. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने समलैंगिक असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. आरोपी दत्ता गाडे खरचं समलैंगिक आहे का? लैंगिक क्षमता चाचणीत याचा खुलासा होणार आहे.
आरोपीची डीएनए चाचणी देखील पूर्ण झाली आहे. बसमध्ये आढळलेल्या केसांच्या नमुन्याच्या मदतीने चाचणी घेण्यात आली. बसमध्ये आढळलेल्या केसांचे नमुने आणि दत्ता गाडेच्या केसांच्या नमुन्यांची मॅचिंग करण्यात आलंय. लवकरच पुणे पोलिसांना चाचणीचा अहवाल मिळेल. डीएनए चाचणीच्या अहवालातून प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होईल.
पीडित तरुणीचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती केली. दादा मला जीवे मारू नको अशी पीडित तरुणीची दत्ता गाडेला विनंती केली. दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचं फलटणला जायचं तिकीट पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केले आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेने आधीही असे गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे गाडेविरोधात ज्यांची तक्रार असेल त्यांनी पुढे यावं असं आवाहन गुन्हे शाखेने केले आहे. गाडेवर याआधीही महिलांसोबत गैरवर्तणूक केल्याचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडूनही याचाही तपास सुरू आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2025 | Trending News
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं साहित्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 3, 2025 | Trending News
लातूरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 2, 2025 | Trending News
Ro Ro Ferry: मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत होणार आहे. रस्ते किंवा रेल्वेमार्गे नव्हे थेट समुद्रमार्गे अति जलद प्रवास करता येणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 2, 2025 | Trending News
Crime Against Women In Maharashtra: महाराष्ट्राला हादरवून सोडणारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्काराची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधून महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या धक्कादायक बातम्या समोर येण्याचा प्रकार सुरु आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशाच दोन घटना मुंबई आणि पुण्यामधून समोर आल्या आहेत. बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या दोन्ही घटनांनी राज्य हादरुन गेलं आहे. पुण्यात एका बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून मुंबईत एका इसमाने आपल्याच चार महिन्याच्या मुलीला संपवल्याची घटना समोर आली आहे.
बापाकडून 14 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासनारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. बापानेच आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. मुलीची आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Pune Rape Case: 400 गावकऱ्यांनी आरोपीला शोधून काढलं; पण ‘या’ एकट्यालाच मिळणार 1 लाखाचं बक्षीस
बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, असं सांगण्यात आलं आहे. या मुलीला घडलेल्या प्रकरामुळे मोठा मानसिक धक्का बसला असून प्रकरण समोर आल्यावर परिसरात खळबळ माजली आहे.
घाटकोपरमध्ये बापानेच 4 महिन्याच्या मुलीला संपवलं
दुसरीकडे मुंबईमधील घाटकोपर येथे मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार प्रकाशझोतात आला आहे. घाटकोपरमधील कामराज नगरमध्ये ही विचित्र आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे असं आपल्याच चार महिन्याच्या बाळाचा जीव घेणाऱ्या नराधम बापाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नक्की वाचा >> महाराष्ट्रात महिला असुरक्षित… केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत टवाळखोरांची छेडछाड
मुलीच्या जन्मापासूनच संजय तिचा तिरस्कार करत होता, अशी माहिती समोर आली आहे. बाळाची आई काही कामानिमित्त घराबाहेर गेली तेव्हा संजयने पाळण्याच्या दोरीने गळा आवळून मुलीची हत्या केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर कामराज नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Mar 1, 2025 | Trending News
मुंबईजवळच्या शहाराला नविन RTO कार्यालय तसेच नविन RTO क्रमांक मिळाला आहे. लाखो वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे.
Source link