by Hansraj Agrawal | Jan 19, 2025 | Trending News
Donald Trump Net Worth: डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणू अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. संपूर्ण अमेरिकेत उत्साहाचं वातावरण आहे. ट्रम्प यांच्या शपतविधीची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगातील विविध देशांमध्ये ट्रम्प यांची मालमत्ता आहे. भारतातही ट्रम्प यांच्यानावर आलिशान बंगल्यापासून टॉवर्सपर्यंत सर्व काही आहे. महाराष्ट्रात डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी प्रॉपर्टी आहे. मुंबई, पुण्यात भव्य ट्रम्प टॉवर आहेत. जाणून घेऊया ट्रम्प यांची भारतात कुठे कुठे संपत्ती आहे. ..
बिझनेस मॅगझिन फोर्ब्सनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सोमवारी 865 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 7,100 कोटी रुपये) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. सध्या भारतात मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे चार ट्रम्प टॉवर आहेत. भविष्यात अमेरिकेपेक्षा भारतात जास्त ट्रम्प टॉवर असतील अशी देखील चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबध आणकी चांगले होणार आहेत.
भारतात अनेक नवीन प्रकल्पांमध्ये ट्रम्प गुंतवणूक करणार आहेत. नोएडा, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक टॉवर, कार्यालयीन इमारती, व्हिला तसेच गोल्फ कोर्स यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मुंबईत ट्रम्प टॉवरचे लाँचिंग झाले. यावेळी ट्रम्प यांनी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती ट्रिप ऑर्गनायझेशनचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी दिली.
भारतात असलेल्या चार टॉवरची किंमत 7500 कोटी रुपये
सध्या भारतात चार ट्रम्प टॉवर आहेत. 30 लाख स्क्वेअर फूटाच्या या टॉवरमध्ये 800 आलिशान निवासी सदनिका आहेत. त्यांची किंमत 6 कोटी ते 25 कोटी रुपयांपर्यंत आहे. या चार प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत अंदाजे 7,500 कोटी रुपये आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात एक ट्रम्प टॉवर आहे. तेथेही एक नवीन कॉम्पलेक्स बांधले जाणार आहे. यात निवासी टॉवरसह, ऑफिस स्पेस, असणार आहेत. याशिवाय नोएडा, हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये ट्रम्प ब्रँडेड गोल्फ कोर्स आणि व्हिला बांधण्याची योजना आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 19, 2025 | Trending News
बारामतीच्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा 11 कोटींचा घोडा चर्चेत आसला आहे. हा घोडा बघायला गर्दी लोटली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 18, 2025 | Trending News
Maharashtra Guardian Ministers : बहुप्रतीक्षित पालकमंत्रिपदांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केलं आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.
सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
बीडमधील जे प्रश्न आहेत, ते इतके जटील झाले आहेत ते पाहता अजित पवार यांनी तिथे स्वतः जाणे पसंत केले असेल. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाटण्याचे काम हे सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा असते. कोणाला कुठला पालकमंत्री पद दिल यावर टीका टिपणी करण्यापेक्षा ज्याला जी जबाबदारी दिलेत ते कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहुयात अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 18, 2025 | Trending News
Gujarat Vs Maharashtra Leopard Issue: मागील अनेक दिवसांपासून हे असले प्रकार सुरु असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना थेट राज्य सरकारला सवाल केला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2025 | Trending News
बीड मस्साजोग प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं, असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला केलाय. त्यामुळे आता या प्रकरणातही धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Jan 17, 2025 | Trending News
Narayangaon Accident: आज सकाळच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये सहा प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.
Source link