by Hansraj Agrawal | Dec 11, 2024 | Trending News
Shivshahi Bus Accident: गोंदिया येथे झालेल्या शिवशाही बस अपघातात 11 जण ठार झाले आहेत. गोंदियातील अपघाताची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल परिवहन आयुक्तांकडे सोपवण्यात आला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2024 | Trending News
संपू्र्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. अशातच मारकडवाडीतून शरद पवार यांच्या EVMबाबतच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी आता उत्तर दिल आहे. EVM मध्ये घोळ करता येत नाही त्यामुळे शरद पवार यांचा विरोध असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तुमच्या EVM ला विरोध असेल तर आधी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा राजीनामा घ्यावा असं थेट आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी मारकवाडीतील सभेतून शरद पवार यांना केला आहे.
त्यावर आम्ही राजीनामा देयाला तयार आहे. तुम्हाला एका मतदार संघाची निवडणूक बॅलेट पेपरवर घेयची आहे. माझी झाली तर आम्ही देखील राजीनामा देऊ. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी अडचण नाही. लोकसभेला EVM मिशन व्यवस्थित होत्या पण विधानसभेत त्यामध्ये फेरफार करण्यात आली म्हणून आम्ही राजीनामा देतोय असं म्हणत गोपीचंड पडळकर यांच्या आरोपांना उत्तम जानकर यांनी उत्तर दिलं आहे.
गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आलाय. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
तर EVMमध्ये घोटाळा करता येत नाही. म्हणून विरोधक विरोध करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.
मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
मारकडवाडीत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येवढचं नाही तर त्यांनी गावात बैलगाडीतून एन्ट्री केली. तसेच विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी आसूडही ओढलेत. त्यामुळे पुढील काही दिवस मारकडवाडीतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अधीक तीव्र होत जाणार यात शंका नाही.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 10, 2024 | Trending News
Maharashtra Weather News : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पश्चिमी झंझावाताचा परिणाम आणखी वाढल्यामुळं सबंध भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. काश्मीरच्या खोऱ्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही तापमानात घट झाली असून, उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रासह देशाच्या उर्वरित राज्यांच्या दिशेनं या शीतलहरी अधिक वेगानं वाहत येत असल्यामुळं गारठा अधिक जाणवू लागला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर असणारं पावसाचं सावट आता जवळपास नाहीसं झालं असून, मुंबईतही थंडीनं पकड मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 9 वर्षांमध्ये मुंबईतील थंडीनं न मोडलेले सर्व विक्रम सोमवार 9 डिसेंबर रोजी मोडीस निघाले. कारण, शहरातील किमान तापमानाचा आकडा 13.7 अंशांवर पोहोचला होता. ‘फेंगल’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये थंडीसाठी पूरक वातावरण निर्मिती होताना दिसत असून, पुढील 48 तासांसाठी हीच स्थिती कायम असणार आहे.
उत्तर महाराष्ट्रामध्येही तापमान 10 अंशांहून कमी झालं असून, या किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढतच असून, त्याचा परिणाम उर्वरित देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात निफाड इथं पुन्हा एकदा पारा 6 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं ही थंडी आता मोठ्या मुक्कामाला आल्याचीच जाणीव होत आहे.
देशातील हवामानाचा आढावा…
राजस्थान, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि झारखंडसह पंजाब, मध्य प्रदेश आणि पूर्वोत्तर भारतामध्येही तापमानात घट नोंदरवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पारा 3 ते 4 अंशांपर्यंत खाली आला असून, मंगळवारी तापमानात आणखी घट होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाल्यामुळं अटारी-लेह राष्ट्रीय महामार्गासहित राज्यातील 87 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तिथं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमानाचा आकडा उणे 1 अंशांहूनही कमी झाल्यामुळं इथं हाडं गोठवणारी थंडी पडल्याचं स्पष्ट होत आहे. देशातील पूर्वोत्तर भागात हलक्या पावसाच्या सरी वगळता उर्वरित देशात थंडीचाच परिणाम कायम असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 9, 2024 | Trending News
Narhari Zirwal Dance: तुम्ही सोशल मीडियावर अपडेट असाल तर तुमच्यापर्यंत नरहरी झिरवाळ यांचा एक डान्स व्हिडीओ पोहोचला असेल. यात ते इंदुरीकर महाराजांसोबत ठेका धरताना दिसत आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 8, 2024 | Trending News
Double-Decker Bridge Over Vasai Creek : महाराष्ट्रात डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलावर खाली रस्त असणार आहे. तर, वरच्या डेकवरुन मेट्रो धावणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Dec 8, 2024 | Trending News
Ramdas Athawale Slams MNS Chief Raj Thackeray: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं असून त्यांनी राज ठाकरेंवरही आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. आठवलेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. तसेच ईव्हीएमच्या विषयावरुन विरोधकांनाही खडे बोल सुनावले.
नाशिक दौरा आणि महायुतीच्या विजयावर भाष्य
“नाशिक विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला आमचा तोटा झाला पण विधानसभेला मोठ यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागांवर युतीने विजय मिळवला आहे. मागील काळात युती सरकारने चांगले निर्णय घेतले. त्यात लाडकी बहिण योजना यशस्वी ठरली,” असं आठवले म्हणाले. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना आठवलेंनी, “विरोधक संविधान राजकारणात आणत आहे पण संविधान कोणाच्या बापाच्या बापाला बदलता येणार नाही,” असा टोला लगावला. विधानसभा निवडणुकीबद्दल आणि नंतरच्या घडामोडींबद्दल आठवलेंनी भाष्य केलं. “या विधानसभा निवडणुकीत मोठ यश आम्हला मिळालं. मुख्यमंत्री पदावरुनचा वाद आघाडीत होता. आमच्यात याबाबत कोणताच वाद नव्हता,” असंही आठवले म्हणाले. “मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे, एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे, महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीने एकत्र लढावे सोबत आम्ही आहोत. आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे,” असं आठवलेंनी आवर्जून नमूद केलं.
राज ठाकरेंवर खोचक टीका
मनसेबद्दल बोलताना रामदास आठवलेंनी, “राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली,” असा टोला लगावला. “आमच्या शिवाय सरकार येणार नाही असं राज ठाकरे बोलले होते. त्याच्या सभेला गर्दी होते पण जागा येत नाहीत. राज ठाकरे युतीत येतील वाटत नाही. मी आहे तर त्याची काय गरज?” असा खोचक सवाल आठवलेंनी उपस्थित केला. पुढे बोलताना, “राज ठाकरे यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिमविरोधी भूमिका घेणे योग्य नाही,” असंही आठवले म्हणाले. “शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यात भगवे, निळा, हिरवा रंग होते पण आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिमविरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तान देशाला बळ देता त्यांच्याविरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत. बतेंगे तो कटेगे असं योगिजी बोले होते. मात्र त्याचा अर्थ, मोदींना पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्र यावे, असा होता,” असंही आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरेंनाही टोला
“पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला. ते राहील किंव्हा आम्ही राहू अशी धमकी देऊन चालत नाही. त्यांनी चूक केली युतीतून बाहेर पडून. खोकेबाज, गद्दार असे बोलूनच शिंदे यांना जास्त जागा मिळाल्या. शपथविधीला परंपरा म्हणून विरोधकांनी येणे गरजेचे होतं. आमदार शपथ घेत नाही हे पण चुकीचे आहे. मग काल नाही तर आज का आमदार शपथ घेत आहेत?” असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला.
ईव्हीएमवरुन सुनावलं
“विरोधकांना माझं आव्हान रडीचा डाव खेळू नका. ईव्हीएम खराब म्हणाऱ्यांचं डोकं खराब आहे. लोकशाहीचा अपमान करू नका. आम्ही काँगेस काळात म्हणलो नाही ईव्हीएम खराब आहे. वाढीव मतदार आले ते वेळच्या आत मतदान केंद्रांवर आले होते,” असं आठवले म्हणाले. पुढे बोलताना आठवलेंनी मारकरवाडी आंदोलनावर भाष्य केलं. “लोकांचं जे म्हणणं असेल त्यावर चौकशी व्हावी. एखादं मशीन खराब असू शकते त्यामुळे शंका सर्व ठिकाणी नको,” असं आठवलेंनी म्हटलं. ईव्हीएममधील काँग्रेस काळातच आले आहे. निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा. लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का? आता आम्हाला जास्त जागा मिळाल्या त्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करावे,” असा सल्ला आठवलेंनी दिला.
Source link