मागील काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व मंत्र्यांनी दांडी मारली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच या बैठकीला गेले होते.
Karale Mastar On Pankaj Bhoyar: कराळे मास्तर आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि तुफान भाषणासाठी ओळखले जातात. यावेळी भंडारा येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर निशाणा साधला. यावेळी कराळे मास्तरांनी पंकज भोयार यांना ‘खादाड’ म्हणून हिणवले. काय म्हणाले कराळे मास्तर? सविस्तर जाणून घेऊया.
Add Zee News as a Preferred Source
आमच्या पालकमंत्री साहेबांनी 67 लाख रुपयांचा एकच लाइट लावला. हा कसला खर्च? मोदींच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या सभेत ग्राउंडवर मुरुम टाकण्याचे आदेश होते, पण ट्रक अडवले. पाण्याच्या कॅन 20-30 रुपयांच्या ऐवजी 150 रुपयांच्या खरेदी केले. 35 हजार खुर्च्या होत्या, प्रत्येक खुर्चीचे 500 रुपयांप्रमाणे भाडे लावले. हे सगळे पैसे कुठे जातात? असा प्रश्न त्यांनी विचारला.
स्मार्ट मीटर योजनेला विरोध
मास्तरांनी स्मार्ट मीटरला खेळणारी योजना म्हटले. मीटरमध्ये सिम कार्ड आहे, रिचार्ज संपले की लाइट कट. जसे मोबाइल बंद पडते. मी स्वतः घरी लावू दिले नाही, फोडून टाकले. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन सांगितले. मीटर रीडर बेरोजगार होतील, कारण डायरेक्ट एमएसईबीला युनिट कळेल. हे मीटर कधीही लाइन कापू शकते, अंधारात राहाल, असा इशारादेखील कराळे मास्तरांनी दिला.
गटार लाइन आणि अमृत योजनेची पोलखोल
अमृत गटार लाइनसाठी 130 कोटींची योजना, पण 800-900 कोटीचे रस्ते खोदले. नवीन रस्ते फोडले, पण काम पूर्ण नाही. मेन रोड उंच, खालचे रोड खाली; इंजिनियरला समजले नाही. ६ इंच पाइप टाकला मग पाणी कसे जाईल? असा प्रश्न विचारत योजना पाच वर्षांपूर्वी सुरू केली पण अजून चालू नाही. यात सगळा भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले.
रोड आणि ड्रेनेजमधील भ्रष्टाचार
पालकमंत्र्यांच्या आमदार काळात ड्रेनेज पाइपलाइन टाकली, एक फुट रस्ता भरला, सिमेंट लेयर लावला आणि तो रस्ता सहा महिन्यात उकरला. यानंतर काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नाही. सर्वांनी पैसे खाल्ले. दोनदा रस्ता खराब झाला आणि दुरुस्त केला. सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारलेले जगात कधी पाहिले आहे? पण विधानसभा निवडणुकीत हे झाल्याचे मास्तर म्हणाले.
जागरुक राहण्याचे आवाहन
“काँग्रेसकडून नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उमेदवार उभे केले. हे सरकार गटार लाइनवर भर देते पण भ्रष्टाचार करतात, असे कराळे मास्तर म्हणाले. ज्यातून खाता येत नाही अशा योजना हे चालू करणार नाहीत. जागोजागी भ्रष्टाचार आहे पण आपण हे थांबवू. त्यामुळे लोकांनी जागरुक राहा, असे आवाहन मास्तरांनी केले.
उत्तर: त्यांनी ६७ लाख रुपयांचा एकच लाईट लावल्याचा आरोप केला. तसेच नरेंद्र मोदींच्या लोकसभा सभेत २०-३० रुपयांच्या पाण्याच्या कॅनऐवजी १५० रुपयांच्या कॅन, ३५ हजार खुर्च्यांचे प्रत्येकी ५०० रुपये भाडे आणि मुरुमचे ट्रक अडवल्याचा गंभीर आरोप केला.
प्रश्न: स्मार्ट मीटर योजनेबाबत कराळे मास्तरांनी लोकांना काय इशारा दिला?
उत्तर: स्मार्ट मीटरमध्ये सिम कार्ड असून रिचार्ज संपले की अर्ध्या रात्रीही लाईट कट होईल, असा दावा त्यांनी केला. स्वतः घरी मीटर लावू दिले नाही, फोडून टाकले आणि गावातील प्रत्येक गरीबाच्या घरी जाऊन मीटर लावू नये असा विरोध केला. “मीटर रीडर बेरोजगार होतील, कधीही लाईट कट होईल” असे त्यांनी सांगितले.
प्रश्न: अमृत गटार लाइन आणि रस्ते फोडण्यात किती भ्रष्टाचार झाल्याचे कराळे मास्तर म्हणाले?
उत्तर: १३० कोटींच्या योजनेसाठी ८००-९०० कोटींचे रस्ते खोदले, नवे-जुने रस्ते फोडले, मेन रोड उंच आणि खालचे रोड खोल असतानाही काम केले, ६ इंच पाईप टाकली पण पाणी जाणे अशक्य, पाच वर्षांपासून काम अपूर्ण, सिमेंट रोडवर डांबर प्लास्टर मारले, दोनदा रस्ते उकरले तरी ठेकेदारांवर कारवाई नाही, असा प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईतील सिडकोच्या कथित जमीन घोटाळ्याची चौकशी होणार आहे. सरकारने त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली आहे. यामुळे सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. तर, दुसरीकडे विरोधकांनी या चौकशी समितीवरच आक्षेप घेतलाय. समितीतील काही अधिकारीच दोषी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
Navi Mumbai CIDCO House Lottery: नवी मुंबईत घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदाच, महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ लिमिटेड (सिडको) ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) खरेदीदारांसाठी एक विशेष गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 4,508 तयार घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विकली जातील. कोणतीही लॉटरी होणार नाही. खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल.
Add Zee News as a Preferred Source
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने (PMAY) अंतर्गत EWS श्रेणीतील खरेदीदारांना 2.50 लाख रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. हे फ्लॅट नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यासारख्या प्रमुख भागात आहेत. थेट महामार्ग, विमानतळ आणि मेट्रो स्टेशनशी जोडलेले आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी 22 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आणि 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’
सिडकोच्या या नवीन गृहनिर्माण योजनेत लॉटरी प्रणाली काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे खरेदीदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट थेट निवडण्याची संधी मिळणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर काम करेल, म्हणजेच लवकर अर्ज करणाऱ्यांना फ्लॅट मिळण्याची शक्यता जास्त असेल. एकूण 4508 फ्लॅटपैकी 1,115 फ्लॅट पीएमएवाय अंतर्गत ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी आहेत, तर उर्वरित 3,363 फ्लॅट एलआयजी श्रेणीतील खरेदीदारांसाठी उपलब्ध आहेत.
या योजनेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 2.50 लाख रुपयांचे अनुदान प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत EWS श्रेणीतील खरेदीदारांना मिळणार आहे. या अनुदानामुळे घराच्या मालकीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होईल. सिडकोने हे सुनिश्चित केले आहे की हे फ्लॅट्स अशा ठिकाणी आहेत जिथे उत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत.
नवी मुंबईतील ज्या प्रमुख भागात हे फ्लॅट आहेत त्यामध्ये तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली यांचा समावेश आहे. ही सर्व गृहसंकुल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो स्टेशन, लोकल ट्रेन आणि प्रमुख महामार्गांशी थेट जोडलेली आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, सर्व 4,508 घरे स्थलांतरित होण्यासाठी तयार आहेत. याचा अर्थ खरेदीदार ताबडतोब ताबा घेऊ शकतात आणि बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.
Raosaheb Danve : जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी होमग्राऊंड असलेल्या भोकरदन नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. एका वेळेचा अपवाद वगळता कधीही हाती न आलेल्या नगरपरिषदेसाठी दानवे यांनी जोरदार तयारी केली आहे. तर काँग्रेसकडून आपला गड कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे भोकरदनमध्ये पाहूयात सविस्तर
Add Zee News as a Preferred Source
जालना जिल्ह्यात 3 नगरपरिषदांच्या निवडणूक होत आहेत. यामध्ये सर्वात लक्षवेधी लढत ठरत आहे ती भोकरदनची. कारण भोकरदन हा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं होमग्राऊंड आहे. लोकसभेतील पराभवामुळे पक्षात काहीसे साईडलाईन झालेल्या दानवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ‘अभी तो मै जिंदा हूँ’ हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.
भोकरदनमध्ये रावसाहेब दानवेंची प्रतिष्ठा पणाला
इथे भाजपने शिवसेना-रिपाइंसोबत युती करत प्रचारात जोरदार आघाडी घेतलीय. भाजपने ज्येष्ठ कार्यकर्त्या आशा माळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत मैदानात उतरवलंय. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकावणार असल्याचा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.
भोकरदन नगरपरिषद ही 2001 ते 2005 अपवाद वळगता कधीही भाजपच्या ताब्यात नव्हती. त्यामुळे 20 वर्षानंतर पुन्हा दानवे यांनी ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांनी आपण केलेल्या विकासकामांचा दाखला देत मतदारांना साद घातली आहे.
‘अभी तो मै जिंदा हूँ” चा संदेश प्रयत्न
भाजपने इथं कितीही जोर लावला असला तरी काँग्रेसचं पारडं जड मानलं जातं आहे. काँग्रेसने यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सूनबाईलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत रिंगणात उतरवलं आहे. जनता कायम आपल्या पाठीशी असल्याचं सांगत काँग्रेसने पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
लोकसभेतील पराभवानंतर रावसाहेब दानवे यांनी भोकरदनची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तसेच राजकारणात ”अभी तो मै जिंदा हूँ”चा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. नगरपरिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम दानवे यांच्याकडून होतं आहे. असं असले तरी दानवे यांच्या प्रयत्नाला किती यश मिळत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Pune News: पुण्यातील हिंजवडीच्या IT हबमधील एका अंगणवाडीत घडलेल्या प्रकाराने पालक आणि स्थानिक नागरिक चांगलेच हादरले. शिकवायचं, खेळवायचं आणि सांभाळायचं अंगणवाडी केंद्र मात्र काही काळासाठी ‘बंदिस्त खोली’ बनलं. अंगणवाडीतील 20 चिमुकल्यांना आत कुलूप लावून सेविका आणि मदतनीस बैठक अटेंड करण्यासाठी निघून गेल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांचा संताप आणि चिंता दोन्ही तीव्रतेने उफाळून आले आहेत.
Add Zee News as a Preferred Source
नक्की कुठे घडला हा प्रकार?
हा प्रकार हिंजवडीमधील अंगणवाडी नंबर 3 मध्ये घडला. दुपारी 11 ते 12 या तासाभराच्या कालावधीत मुलं आत बंद होती आणि व्हिडीओमध्ये त्यांचा रडण्याचा आवाज, घाबरलेले चेहरे आणि एकटेपणाचा आक्रोश स्पष्ट जाणवतो. IT हबसारख्या गजबजलेल्या भागात मुलांना अशा अवस्थेत टाकून जाणं ही बेदरकार कृती असली तरी, तिचे परिणाम मात्र गावाच्या चौकापासून ते सोशल मीडियाच्या स्क्रीनपर्यंत सर्वत्र पोहोचले.
बैठक महत्त्वाची की मुलांचे जीव?
सविता शिंदे (सेविका) आणि शिल्पा साखरे (मदतनीस) यांनी ग्रामपंचायतीतील एका बैठकीसाठी बोलावलं गेल्याचा दाखला दिला. आम्हाला ‘यात मान होता, उपस्थिती महत्त्वाची होती,’ असं सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र मुलांना आत ठेवून कुलूप लावून जाणं ही ‘क्षुल्लक गोष्ट’ नव्हती, हे आता जगजाहीर झालं आहे. बैठकीला बोलावणारे ग्रामपंचायतीत एका माजी सरपंच असल्याचे कारण समोर आले, पण ‘मुलांना सांभाळण्याची जबाबदारी’ बैठक बोलावणाऱ्यांपेक्षा मोठी असते, हेच त्या विसरल्या.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुळशी पंचायत समितीला कळवलं. बालविकास विभागाचे अधिकारी धनराज गिराम यांनी कोणताही विलंब न करता, सेविका आणि मदतनीसांना बैठक सोडून तात्काळ कुलूप उघडण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर जबाबदारांवर काय कारवाई होणार, पालकांच्या तक्रारीचं पुढे काय रूप घेणार आणि बाल विकास विभाग याला ‘अधिकृत दखल’ कशी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.