by Hansraj Agrawal | Sep 2, 2024 | Trending News
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आधी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट होती शेवटची मुदत होती. अधिकाधिक महिलांना लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार यासंदर्भात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 35 वयोगटातील महिला आणि मुलीसाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना 1500 रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्य आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत. 14 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
काँग्रेसची कोर्टात धाव, सरकारचं उत्तर
काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. “ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत. मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू. या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत, असे आवर्जून नमूद केले.
दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे. “राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली.
“राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टात गेले आहेत. त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार तेच आहेत जे नाना पटोले, विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईड हँड म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनांवर फास पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली.
Source link
by Hansraj Agrawal | Sep 1, 2024 | Trending News
पुढील
बातमी
‘महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं…’, रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला
Source link
by Hansraj Agrawal | Sep 1, 2024 | Trending News
IAS Amit Kale Success Story: एमपीएससी, यूपीएससी उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण वाचतो. या सर्वांनी अपार मेहनतीने हे यश मिळवलंय. त्यांतील अनेकांच्या वाट्याला तर कायमचा संघर्ष आलाय. पण संघर्षावर मात करत आपल्या शिक्षणाशी प्रामाणिक राहत त्यांनी हे यश मिळवलंय. अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशाच्या कहाण्या आपण झी 24 तासच्या सक्सेस स्टोरीच्या सदरातून वाचत आलोय. त्यात आजची ही कहाणी खास आहे. ही कहाणी महाराष्ट्राच्या लेकाची आहे. ही कहाणी एका तमासगिरीणीच्या पुत्राची आहे. ही कहाणी म्हणजे लाखो लोककलांवतांची मान अभिमानाने उंचावणारी आहे. ही कहाणी अमित माने यांची आहे.
अमित माने हे आयएएस अधिकारी आहेत. इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतची त्यांची वाट खूप खडतर होती. लोककलाकाराच्या घरात त्यांचा जन्म झाला. बहुतांश लोककलाकारांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य नसतं. ना कधी सरकार दरबारी त्यांना मान सन्मान मिळत, ना कधी आपल्या कलेचा योग्य मोबादला मिळत. अशा परिस्थितीत ते आपली कला लोकांसमोर सादर करत असतात. लोककलेची पंरपरा पुढे नेत असतात. अशा परिवारात जन्म घेऊन आयएएस अधिकारी बनण्यापर्यंत मजल मारणं यामुळे अमित यांचं यश खास आहे. अमित यांनी घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज लहानपणापासूनच ऐकला.कोल्हाटी समाजात त्यांचा जन्म झाला. तमाशाच या समाजाचे जग आहे, तमाशालाच हा समाज आपली पंढरी मानतो. आजुबाजूला शिक्षणासाठी पोषक वातावरण नसताना अमित माने यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.
तमाशाच्या कमाईतून उदरनिर्वाह
राजश्री काळे या तमाशा कलावंतीण म्हणून आपली कला सादर करत. गावोगावी जाऊन कला सादर करत मिळालेल्या कमाईतून आपला उदरनिर्वाह त्या भागवत असत. त्या नगरच्या राहणाऱ्या आहेत. लोककलेवर त्यांचे अतिशय प्रेम. लोककला त्यांच्या अंगात अक्षरश: भिनली होती. लावणी कला जिवंत ठेवण्यासाठी त्या नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवायच्या. व्यवसायानं तमाशा कलावंत असलेल्या राजश्री यांच्या पोटी अमोल यांचा जन्म झाला. तमाशा कलावंतीणीच्या पोटी जन्मलेला हा पोरगा भविष्यात आपल्या आईसह जिल्ह्याचं नाव रोशन करेल, असे फार कमी जणांनाच वाटले असेल. तमाशाच्या वातावरणात अमित काळेंचे शिक्षण पूर्ण झाले. तमाशाच्या सुपारीसाठी अमित यांच्या आईला गावोगावी फिरावं लागायचं. त्यात पोराबाळांची परवड होत असे. शिक्षणाचा तर मागमूसही नसायचा. कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर आमितची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्री यांनी काळजावर दगड ठेवत पोटच्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं होतं.
कोल्हाटी समाजाचं नाव उंचावलं
अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं राजश्री यांनी उचलला. लहानपणापासून मुलाला चांगले संस्कार दिला. तुला कलेक्टर व्हायचंय, हे ध्येय त्यांनी अमित यांच्या डोळ्यासमोर ठेवलं. अमित यांनादेखील परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी यूपीएससी परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. दिवस रात्र एक करुन मेहनत घेतली.कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून दूर राहिला आहे. त्यामुळे समाजाला त्यांच्या यशाचं खूप मोठं कौतुक आहे. आयएएस बनून कोल्हाटी समाजाचं नाव आणखी उंचावलं.
माऊलीच्या कष्टाचं चीज
अमित काळे यांच्या आई राजश्री आजही नगर – पुणे रस्त्यावर कालिका कला केंद्र चालवतात. तिथे रोज संगीत बारी होते. लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री यांना गौरवण्यात आलं. पण आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टाहास… तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Aug 31, 2024 | Trending News
पुढील
बातमी
बारामतीच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड; जय पवार आणि युगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात
Source link
by Hansraj Agrawal | Aug 31, 2024 | Trending News
NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत सारंकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर बाहेर येऊन उलटी होते, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले होते. यानंतर भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्देवी होती, हा असंगाशी संग असल्याची टीका केली. यामुळे महायुतीतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरणं आहे. या सर्वावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीणच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी 2019 मध्ये काटोल मतदारसंघ राष्ट्रवादी करता जिंकला होता.
काय म्हणाले अजित पवार?
माझं बोलणं पंतप्रधान मोदी, केंद्रीय अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाले आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात तर माझे कार्यकर्तेदेखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं माझं काम सुरु आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही, असे ते म्हणाले.
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.
राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया?
हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले. महायुतीमध्ये आम्ही काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरुन काम करतोय. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे यांच्या पोटात दुखतय. वरिष्ठ पातळीवर विधान होतील तेव्हा जशास तसं उत्तर दिली जातील. आपले आमदार आहेत तिथे भाजपला किती मतं मिळाली? याचे हाकेंनी आत्मचिंतन करावं. उगीच अशी विधाने करुन गोंधळ निर्माण करु नये असे सुरज चव्हाण म्हणाले.
काटोल विधानसभेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने?
मात्र राष्ट्रवादीतील फाटाफुटी नंतर ही जागा महाविकास आघाडीत पुन्हा एकदा अनिल देशमुख लढवतील अशी चिन्हं आहेत. तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या जागेसाठी आग्रही आहेत.. अजित पवार आज जनसमान यात्रेच्या निमित्ताने काटोल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच तिथे बाईक रॅलीत सहभागी होणार आहे..महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दाखल झाल्यानंतर अजित पवार जिल्ह्यात फक्त काटोल येथेच जाणार आहेत.. त्यामुळे महायुतीमध्ये काटोलची जागा मिळावी याचे संकेतच अजित पवार यांनी दिलेय .. तर भाजपही या जागेसाठी आग्रही असून भाजपाचे अनेक नेते काटोल मधून लढण्यास इच्छुक आहे
Source link
by Hansraj Agrawal | Aug 30, 2024 | Trending News
Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरचा घाटी रुग्णालय म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्याही जिल्ह्यांसाठी सगळ्यात मोठ हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो लोक उपचारासाठी येतात. मात्र याच दवाखान्यात एका तरुणीला संतापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय.
Source link