अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!

अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं!


पुढील
बातमी

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘पोलिसांनी…’





Source link

'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेऊन ठेवले; ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…'

'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेऊन ठेवले; ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…'


Loan On Maharashtra Pending Bills By State Government: “आर्थिक शिस्तीचे पालन करणारे राज्य ही महाराष्ट्राची ओळख मिटवून टाकण्याचा विडाच राज्यातील मिंध्यांच्या सरकारने उचललेला दिसतो आहे. केवळ विडाच उचलला असे नव्हे तर राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन आर्थिक शिस्तीचे राज्य ही ओळख पुसून टाकण्यात मिंध्यांची राजवट दुर्दैवाने यशस्वी झाली आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारवर निशाणा साधला आहे. “ऋण काढून सण साजरे करण्याच्या अनिष्ट वृत्तीमुळे राज्याची आर्थिक शिस्त संपूर्णपणे कोलमडली व सरकार पुरते कंगाल झाले. आता तर परिस्थिती इतकी बिकट बनली आहे की, विकासकामांवर खर्च करण्यासाठी सरकारकडे छदामही उरला नाही,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’

“तिजोरीत खडखडाट झाल्याने राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या विकासकामांची तब्बल 36 हजार कोटी रुपयांची बिले थकली आहेत. सरकार दिवाळखोरीत निघाल्याचाच हा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावरील कर्ज या सरकारने 8 लाख कोटींवर नेऊन ठेवले. सरकारच्या उत्पन्नातील बहुतांश रक्कम या कर्जाचे व्याज फेडण्यात जात असल्याने तिजोरीत काही शिल्लकच उरत नाही, अशी अवस्था आहे. तरीही  राज्याची आर्थिक घडी उद्ध्वस्त झाल्याचे हे वास्तव लपवून मिंध्यांचे सरकार निवडणुकीच्या तेंडावर रोज नवनव्या फुकटछाप घोषणांचा पाऊस पाडत सुटले आहे. ‘तिजोरीत नाही आणा, तरी मला बाजीराव म्हणा’ अशी या सरकारची दुर्गती झाली आहे,” अशी टीका ‘सामना’मधून करण्यात आली आहे.

शिंद्यांच्या विद्यमान खोकेशाहीत…

“सरकार व मंत्रालयाचे उंबरठे झिजवून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते व कंत्राटदारांनी विकासकामांची कंत्राटे मिळवली, पण कामे पूर्ण झाल्यानंतरही या कामांची हजारो कोटींची बिले सरकारने थप्पीला लावून ठेवली आहेत. बिलांच्या थकबाकीने हवालदिल वगैरे झाल्याने अभियंते, कंत्राटदार सरकारविरुद्ध शड्डू ठोकण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे. सरकारच्या तिजोरीत खडपूही शिल्लक नाही. त्यामुळे कंत्राटदारांना या कामांची बिले मिळतील तरी कशी? राज्याच्या सर्व भागांत पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे कशी जोरात सुरू आहेत, असे ढोल सरकारने मोठ्या थाटात बडवून घेतले; पण या कामांसाठी खर्च झालेले पैसे देण्यासाठी मात्र सरकारकडे फंड उपलब्ध नाही. विभागांसाठी मंजूर झालेला व उपलब्ध असलेला निधी किंवा कुठल्याही आर्थिक बाबींचा आगापिछा न पाहता सरकारच्या पाठीराख्यांना खूश करण्यासाठी होलसेलात कामे काढण्यात आली. वरील सर्व विभागांमध्ये भरमसाट निविदा काढून मर्जीतील लोकप्रतिनिधींना वा लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळण्यासाठी खिरापत वाटावी अशा पद्धतीने कामांचे वाटप करण्यात आले. तथापि, आता कामे पूर्ण झाल्यावर मात्र निधीअभावी सरकारने ही बिले अडकवून ठेवली आहेत. त्यामुळे राज्यातील कंत्राटदार महासंघाने सरकारविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारच्या कामांमध्ये सरसकट सर्वच कंत्राटदारांना सहानुभूती दाखवावी अशीही परिस्थिती नाही. कारण मिंध्यांच्या विद्यमान खोकेशाहीत विकासकामांची अंदाजपत्रके कशी फुगवली गेली हे काही आता लपून राहिलेले नाही,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> संपूर्ण महाराष्ट्रात यलो अलर्ट! मुंबईसहीत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार कोसळणार; आठवडाभर..

‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची…

“केवळ या विकासकामांचीच बिले या सरकारने थकवली असे नव्हे. गतवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची खास बैठक घेऊन मराठवाड्यासाठी 46 हजार कोटींच्या वेगवेगळ्या कामांच्या घोषणा मिंधे सरकारने केल्या होत्या, मात्र या 46 हजार कोटींपैकी 46 पैसेही सरकार गेल्या वर्षभरात खर्च करू शकले नाही. सरकारच्या तिजोरीची ही अशी दुरवस्था या अलिबाबा सरकारने करून ठेवली आहे. चौफेर लुटमार हेच त्याचे कारण आहे. 8 लाख कोटींचे कर्ज व तिजोरीची कंगाल अवस्था झाली असतानाही ‘लाडकी बहीण’ व ‘लाडका भाऊ’ यासारख्या योजना राबवून ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्याची अखेरची धडपड मिंधे मंडळ करीत असले तरी त्यांना त्यात यश येणार नाही,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

नव्या सरकारला पहिले काम…

“आर्थिक शिस्तीच्या बाबतीत दाखवलेल्या अकलेच्या दिवाळखोरीमुळेच मिंध्यांचे सरकार दिवाळखोरीत निघाले आहे. तिजोरीतील खडखडाटाने राज्यातील विविध विकासकामांची तब्बल 36 हजार कोटींची बिले थकली आहेत. महाराष्ट्राची सत्ता जशी ओरबाडून मिळवली त्याच पद्धतीने राज्याची तिजोरी ओरबाडण्याचे कामही अनेक हातांनी सुरू आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर होईलच; तेव्हा नव्या सरकारला पहिले काम या लुटालुटीच्या ऑडिटचेच करावे लागेल,” असं म्हणत लेखाचा शेवट करणार आहे.





Source link

पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?

पती आत्महत्या करताना पत्नी बाजूला बसून पूजा करत होती, नाशिकमधील घटनेनंतर खळबळ; नेमकं काय घडलं?



Nashik Crime News: नाशिक येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 
 



Source link

मुंबई विद्यापाठीची सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली; मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका

मुंबई विद्यापाठीची सिनेट निवडणुकीवरील स्थगिती उठवली; मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका



मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला होणार आहे.. याबाबत मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय.. विद्यापीठ प्रशासनानं ऐन वेळी निवडणूक स्थगित केल्यानं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.. आता हायकोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनांना मोठा दिलासा मिळालाय.. 



Source link

पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'

पुणे विमानतळाचं नाव बदलणार! फडणवीसांची घोषणा; गडकरी म्हणाले, 'आम्ही पंतप्रधांनाकडून..'


Pune Airport Renamed: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये आज वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे केंद्रात मंत्री असलेल्या गडकरींनीही फडणवीसांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत सदर मंजूरी मिळवणारच असं आश्वासन दिलं.

काय नाव देणार?

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये, पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल असं जाहीर केलं. पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे. “राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत,” असं फडणवीस जाहीर भाषणात म्हणाले.

प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय…

पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. तो मार्गी लागला याचा आनंद आहे, असं नितीन गडकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. तसेच पुढे बोलताना गडकरींनीही लोहगाव विमानतळाचा उल्लेख केला. “लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही,” असं गडकरी म्हणाले. 

नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, ‘तुम्ही कार..’

5000 कोटींचे नवीन काम हाती घेणार

गडकरींनी यावेळेस बोलताना, “मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे कात्रजपासून सुरू करणे आवश्यक होते. पण अधिकाऱ्यांनी ते होऊ दिले नाही. ती माझी चूक झाली,” असंही म्हटलं आहे. तसेच गडकरींनी आता पुणे-सातारा रस्त्यासाठी नव्याने कंत्राट दिलं जाणार असल्याचं जाहीर केलं. “पुणे-सातारा रस्त्याचे सध्याचे कंत्राट रद्द करणार असून 5000 कोटींचे नवीन काम हाती घेणार आहोत. पुणे-सातारा एलिव्हेटेड रोडचा आराखडा मंजूर झालेला आहे,” असं गडकरींनी सांगितलं.

नक्की वाचा >> ‘कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत…’; गडकरींचं सूचक विधान

पुण्यात दीड लाख कोटींची कामे

पुणे जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख कोटींची कामे सुरू होतील. पुणे ते संभाजीनगर 2 तासांत जाता येईल असा रस्ता करणार. आखणी झालेली आहे, असंही गडकरी म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी, “पुण्यातील पालखी मार्गाचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगतानाच आज शेवटच्या टप्प्याचा शुभारंभ होत आहे. लवकरच संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वाला येईल. त्याबद्दल गडकरीजींना धन्यवाद देतो,” असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचे आभार मानले.





Source link

दादांचा विषय लय हार्ड… अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान

दादांचा विषय लय हार्ड… अजित पवारांचं मुस्लीम कार्ड? मुंबईसाठी जबरदस्त प्लान



Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकासाठी अजित पवारांनी गुलाबी कॅम्पेन सुरु केलं.. मात्र आता अजित पवार विधानसभेसाठी मुस्लीम कार्डही वापरणार असल्याचं समजतंय.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp