दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

दया कुछ तो गडबड है! लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?


Nagpur Audi Car Accident : नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री एका भरधाव ऑडी कारनं (Audi Car) दोन कार आणि एका बाईकला उडवलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलाग संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याची असल्याचं समोर आलं. अपघातावेळी संकेतही ऑडीमध्ये होता हे नंतर पोलीस तपासात समोर आलं.

हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमधून गायब

ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. पण अपघाताआधी संकेत बावनकुळेसह अर्जुन, रोहित आणि आणखी एक तरुण लाहोरी रेस्टोरेंट आणि बारमध्ये बसले होते. पण पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण सीसीटीव्ही फुटेजमधून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह पाहण्याची सोय आहे. त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआर मध्ये स्टोरेज झालेलं नाही.त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावेळी संकेत बावनकुळेसह इतर तीन तरुण त्यात दिसले नाहीत.

सीसीटीव्हीतलं फुटेज डिलीट केलं?

पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील डीव्हीआर जप्त करण्या आलं असून डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. फॉरेन्सिक चाचणीत फुटेज डिलीट केलं आहे की नाही याची माहिती मिळेल असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान ऑडी कार अपघातस्थळाचं फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून याआधारे पोलीस पुढचा तपास करत आहेत. विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट दिली होती.

अर्जुन हावरेविरोधात गुन्हा

अपघातावेळी ऑडी कारमध्ये अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार, आणि संकेत बावनकुळे असे तिघेजण बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे.. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते, अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.





Source link

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; सरकारने घेतला मोठा निर्णय; 100 कोटींचा प्रस्ताव



छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर  सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 



Source link

माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी

माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी


पुढील
बातमी

‘…तर टायरमध्ये घ्या!’ संतापलेल्या अजित पवारांचा सल्ला; म्हणाले, ‘आम्ही कोणताही…’





Source link

आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल

आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय; अजित पवारांना कार्यकर्त्यानं लिहीलेलं निनावी पत्र व्हायरल


Ajit Pawar :  बारामती: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा दारुण पराभव झाला. सर्वाधिक वाताहत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. चार जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला केवळ एक जागा जिंकता आली. त्यात बारामतीत अजित पवारांच्या होमग्राऊंडवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे सुळेंनी बारामती विधानसभा मतदारसंघातून ४० हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्क्य घेतलं. याच मतदारसंघातून अजित पवार २०१९ मध्ये तब्बल दीड लाखांहून अधिक मताधिक्क्यानं विजयी झाले.

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला. भाजपचा हात धरणाऱ्या अजित पवारांना लोकसभेत पराभव पाहावा लागला. तर शरद पवारांनी १० पैकी ८ जागा निवडून आणल्या. तब्बल ८० टक्क्यांचा स्ट्राईक रेट राखण्याची किमया त्यांनी करुन दाखवली. शरद पवारांच्या झंझावातासमोर अजित पवारांचा निभाव लागला नाही. अजित पवारांच्या एकाही उमेदवाराला शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव करता आला नाही.

आदरणीय दादा…

बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो.‌ पण, काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळे कापड लावलं गेलं. तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आज आमचं दुर्दैव आहे कि नाव लपवून लिहावं लागतंय कारण, नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का? हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणं सुध्दा पार बदलून गेलंय. तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात ‘चूक’ झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न माझ्या सारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तोचं संभ्रम तुमच्या काल-परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकचं गडद केलाय. सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा ‘सूर’ नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळविताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? अशी भीती वाटत राहाते. ‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्या सारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाचं नव्हे तर, आपले सगळे जीवाभावाचे पदधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत. कारण, वैनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेचं जबाबदार आहोत, अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहाणे, आता सहन होत नाहीये, जीवाची घालमेल होत आहे.

बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र, पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय. आता आम्ही एकमेकांचे तोंड सुध्दा बघत नाही. कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या, तरी आमच्यावर संशय घेतला जातो. एवढं कलुषित वातावरण झालंय. अशावेळी तुम्ही मात्र, माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीचं पंचाईत केलीय. त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला, आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येवू नये?

दादा, लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होवू नका. विकासाला महत्त्व द्या. भावनिक होवून प्रश्न सुटणार नाहीत, असं म्हणत होतात. भावनिक होवून रडले म्हणून तुम्ही सुध्दा तशीच जाहीर ॲक्टींग केली होती. पण, आता मात्र तुम्ही स्वत: खूपचं भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय. त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात? तुमचा आत्मविश्वास पहिल्या सारखा का दिसत नाही? तुम्ही कसल्या तरी ओझ्याखाली दबलेले आहेत, असे वातावरण का निर्माण झाले आहे? आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत.

दादा, तुम्हाला आठवतंय का? पवार साहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला. पुढे तुमच्या आणि वैनींच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादासाठीही मी फिरलोय, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन. कारण, आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्या सोबत आहेत. वडीलांकडून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलोय. ‘विकासाचा वादा, अजितदादा’ आणि ‘एकच वादा, फक्त अजित दादा’ अशा घोषणाही अगदी बेंबींच्या देठापासून देत आलोय. मधल्या काळात तुम्ही वेगळा निर्णय घेतलात, तरीही ‘फक्त दादा’ असं म्हणून मी तुमच्या सोबत राहिलो आणि भविष्यातही आहे. त्यासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांची निष्ठा पणाला लावली. पण, तुमच्या सोबत निष्ठेनं राहिलो. लढलो. मात्र, वैनींचा पराभव झाला आणि तुम्ही मला आणि आपल्या असंख्य पदधिकारी व कार्यकर्त्यांना पाण्यात बघू लागलात. तुमच्या लेखी आम्ही कुचकामाचे किंवा आरोपी ठरलोय. म्हणून तुम्ही आमच्याकडे संशयाने पाहात आहात. त्यामुळे आता तुमच्या अवती-भवती सुध्दा येण्याची भीती वाटू लागलीय. तुम्ही कधी आणि काय बोलाल? याची चिंता सतावते आहे.

बारामतीतून आता मला रस नाही. आपण तसा समाधानी आहे? झाकली मूठ लाखाची. एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय देवू शकतात, तर काय करणार? जिथं पिकतं, तिथं विकत नसंत. तुम्हाला एक नवीन आमदार मिळाला पाहिजे? मग, त्याची आणि माझी कारकीर्द बघा. शेवटी, मीचं निर्णय घेणार आहे. मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, अशी तुमची विधाने ऐकून मला तर, धक्काचं बसतोय. पण, अशा बोलण्यातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हेचं मला कळत नाही. तरीही, तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीचं नव्हे तर, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी मान्य केलेत. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिलोय. तुमच्या भूमिकेचा आदर केलाय. एके दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झालात. तेव्हा, निधड्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, असं म्हणत तुमचं समर्थन केलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला ‘नमक हराम’ म्हटलं. तरीही मी मागे हटलो नाही. तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी ‘गद्दारीचा’ शिक्का पाठीवरती घेवून लोकसभेला गावोगाव फिरलो. वैनींचा प्रचार केला. पण, वैनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी ‘कुचकामी’ आणि ‘गद्दार’ ठरलोय, याचं जास्त वाईट वाटतंय.

कसं दादा, म्हणतील तसं? हे ब्रीद घेवून आजपर्यंत तुमच्यासाठी काम करीत आलोय. तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय. मात्र, वैनींचा पराभव तुमच्या ‘जिव्हारी’ लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय. पण, दादा! लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केलंय. गावोगावी प्रचार केलाय. तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलोय, हे तुम्हाला कसं पटवून देवू? हेचं कळत नाहीये. तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीचं अविश्वास नव्हता. म्हणून तर, तुमच्यासाठी आम्ही विरोधकांनी आम्हाला ‘मलिदा गॅंग’ म्हटलं. आम्ही तेही गपगुमान सहन केलं. कारण, माझ्यासाठी माझे दादाचं माझं काळीज आहे. आता तेचं दादा, आम्हा सगळ्यांना शंकेने किंवा संशयाने पाहाणार असतील तर, मी काय करायला हवं? सध्या ‘ना घर का न घाट का’ अशीच माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आवस्था झाली आहे. मग, ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली. मान-सन्मान मिळाले. त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्ही नेमकं काय मिळवलं? असंही वाटतंय.

दादा, अलीकडे तुमच्या बद्दल कुणीही काहीही बरळतं. तरीही तुम्ही गप्प बसता. नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात. पण, त्यांना कुणीही सिरीयसली घेत नाहीत. त्या तानाजी सावंत पासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाके पर्यंत सगळे तुमच्यावर तोंडसुख घेत आहेत आणि तुम्ही मात्र, आमच्यावर नाराज होवून आम्हालाचं आरोपीच्या पिंजऱ्यांत उभं केलंय, याचं फार वाईट वाटतंय. एकीकडे तुम्ही हिंदी चॅंनलेला मुलाखती देताय. चूक झाली, असं सांगताय. समाजाला असलं आवडत नाही, म्हणताय. त्यामुळे तुमच्या नरमाईच्या सूराचा अंदाज येत नाही. हे तुम्ही स्वत:हून करताय की तुम्हाला कुणी कराय लावतंय? हाही प्रश्नचं आहे. तर, दुसरीकडे तुम्ही तिसरी आघाडी करून लढणार आहात, असं भाजपचे समर्थकचं सांगताहेत? त्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या तुमची चिंता वाटतेय. कारण, तुमच्या सोबत आम्ही सुध्दा ‘गद्दारीचा शिक्का’ पाठीवरती झेललाय आणि तुम्हाला घराच्या देव्हाऱ्यातच नव्हे तर, आमच्या काळजात सुध्दा स्थान दिलंय.  

दादा, सध्या तुम्ही ‘पिंक’ झाला आहात आणि तुमचे विचारही ‘पिंक’ झाले आहेत की काय? अशी शंका मला येत आहे. कारण, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांसह जीवाभावाच्या सगळ्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे, त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे, त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमचे लाडके दादा कधीचं नव्हते आणि यापूर्वी आम्ही कधी अनुभवले सुध्दा नाहीत. आपल्या बारामती विधासभेत तुतारीला ४७ हजार ३८१ मतांचं लीड मिळालं आणि वैनींचा पराभव झाला. त्यामुळे तुम्ही रागावलात. तुमचं रागावणं स्वाभाविक आहे. तो पराभव जसा तुमच्या ‘जिव्हारी’ लागलाय, तसा तुमचा निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची ‘सल’ मलाही आहे. पण, जास्त ताणू नका. रात गयी, बात गयी! म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात. निराशेची जळमटे फेकून द्या. जिद्दीने उभे राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू!  
कळावे आपलाचं,
एक निष्ठावंत कार्यकर्ता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- घड्याळ तेच वेळ नवी





Source link

Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत…

Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत…


Nagpur Hit And Run Case: नागपूरमधील सीताबर्डी येथे 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या हिट अँड रन दुर्घटनेमध्ये भारती जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुत्र संकेत बावनकुळेचं नाव समोर आलं आहे. मध्यरात्रीनंतर भरधाव वेगातील ज्या कारने पादचाऱ्यांना धडक देऊन जखमी केलं त्या कारमध्ये संकेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मात्र आता याच प्रकरणामध्ये ठाकरेंच्या पक्षातील महिला नेत्याने वेगळीच शंका उपस्थित केली आहे. बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी भाजपाचं थेट काँग्रेसबरोबरच साटंलोटं आहे की काय असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवर शंका

काँग्रेसचे नागपूरमधील नेते विकास ठाकरेंनी या प्रकरणाशी संकेत बावनकुळेंचा काही संबंध नसून तसं असतं तर आम्ही त्यांना सोडलं असतं का? असा अर्थाचं विधान केलं. मात्र आता या विधानावरुन ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला आहे. सीताबर्डी येथे पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी नागपूरमध्ये पोहोचलेल्या सुषमा अंधारेंनी विकास ठाकरेंच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे.

नक्की वाचा >> Nagpur Hit & Run: ‘कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय’; ‘दोघे मृत्यूशी झुंज देत असताना…’

“विकास ठाकरेंच्या मतदारसंघातील घटना होती तर त्यांना सकाळीच व्यक्त व्हायला काय झालं होतं? 36 तास उलटून गेल्यावर व्यक्त झाले? यातील अपघातातील अर्जुन हावरे याचे वडील आणि ठाकरे यांचे वक्तव्य नेमका काय अर्थाअर्थी संबंध आहे. ते तथ्य समजून घेऊ. ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवारी यांचे एक स्टेटमेंट येतं. यानंतर विकास ठाकरे यांना असं स्टेटमेंट करावसं वाटतं याचाच अर्थ कुठेतरी भाजपाच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिक नेते पुढे आले आहेत. मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही. नागपूरचे काही स्थानिक नेते अग्रेसर आहेत का?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.

नक्की वाचा >> ‘…मग संकेत बारमध्ये दूध प्यायला गेलेला का?’ बावनकुळेंना Hit & Run वरुन सवाल

सोशल मीडियावरुनही टोला

“संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी सत्ताधारी तर प्रयत्न करतच आहेत पण काँग्रेसच्या विकास ठाकरेंनीही प्रयत्न करावेत हे माझ्यासाठी कमालीचे अनाकलनीय आहे. पोलीस स्वतः सांगताहेत की संकेत त्या गाडीमध्ये होता आणि विकास ठाकरे म्हणतात संकेतचा संबंधच नाही..!! घोर कलियुग,” अशी पोस्टही त्यांनी केली आहे.

आता या प्रकरणावर अंधारेंनी नोंदवलेल्या मतानंतर काँग्रेस तसेच विकास ठाकरे काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र


नितेश महाजन, झी मीडिया जालना : मराठा आरक्षणासाठी जरांगे येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणला (Hunger Strike) बसणार आहेत. 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता म्हणजेच मराठा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून (OBC Quota) स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगेंनी आतापर्यंत पाच वेळेस उपोषण केलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी 29 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी 17 सप्टेंबरपासूनच उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय. जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे

मराठा आरक्षणासाठी जरांगेंची यापूर्वीची उपोषणं

जरांगेंनी 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा उपोषण केलं.

दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर2023 दरम्यान केलं

तिसरं उपोषण 20 ते 27 जानेवारी 2023 असं 8 दिवसांचं उपोषण केलं

चौथे उपोषण 8 जून ते 13 जून असे 6 दिवस जरांगेंनी उपोषण केलं.

जरागेंनी पाचवं उपोषण 20 ते 24 जुलै 2024 असं पाच दिवस उपोषण केलं

मनोज जरांगे यांच्या यापूर्वीच्या उपोषणामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. तसंच उपोषणाचे पडसाद राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यातच आता विधानसभेसाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केलीय. सध्या मनोज जरांगे हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. त्यातच आता मनोज जरांगेंनी उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे.

महायुतीच्या मंत्र्यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, देवेंद्र फडणवीस सत्तेतील मंत्र्यांना कामे करून देत नाहीत या मनोज जरांगे यांच्या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना बाहेरून माहिती अपुरी मिळते. मराठा आरक्षण संदर्भात तुमची कुठलीही शंका असेल तर तुम्ही आधी मला विचारा किंवा मला सांगा मी शंकांचे निरसन करेल. याविषयी अधून मधून माझं त्यांच्यासोबत आरक्षणाविषयी बोलणं चालू आहे. मराठा आरक्षणाविषयी अजूनही काही शंका असतील त्यांनी मला सांगावं मी त्यांच्या शंकांचे निरसन करेन अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे





Source link

YouTube
Instagram
WhatsApp