रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार

रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवार आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देणार


Sharad Pawar News:  रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत. यावेळी आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित भांगरेच्या मागे शक्ती उभं करण्याचं आव्हान शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केले आहे. अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या. तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.

पाच वर्षांपूर्वी एका डॉक्टरला (आमदार किरण लहामटे) मी निवडून दिलं. मला वाटलं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत देईल. काही झालं तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाही असे भाषण केले. मुंबईत गेला भलतीकडे जाऊन बसला. कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत बसवायची वेळ आलीय. तरुणांच्या ताकदीवर अकोले आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही..

निवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलंय

निवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलंय…शरद पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय…निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पवार गटाला दिलासा मिळालाय…अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलंय…पिपाणी चिन्हामुळे पवार गटाला लोकसभेत फटका बसला होता…शिरूर, माढा, बीड मतदारसंघात पिपाणी या चिन्हाला जास्त मतं पडली होती…तसंच साता-यातील जागा ही पिपाणी चिन्हामुळे पडली होती असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता…त्यामुळे विधानसभेसाठी पवार गटाला मोठा दिलासा मिळणाराय…

मविआतील मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून राऊतांनी पुन्हा एकदा सूचक विधान केलंय…मुख्यमंत्रिपदाबाबत मविआचा चेहरा कोण हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे असं विधान राऊतांनी केल्यानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय…तर मुंबई, कोकण हा शिवसेनेचा गड आहे…तर काँग्रेसचा विदर्भात प्रभाव असून, राष्ट्रवादी पवार गटाचा पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव आहे…त्यामुळे पक्षाच्या प्रभावानुसार मविआत जागावाटप होईल अशी माहिती राऊतांनी दिलीय…

भाजपकडून अजित पवार गटाची तक्रार केल्यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केलीय…मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती आहे…मात्र, हा त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावलाय… गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बघता विधानसभेच्या तिन्ही जागा काँग्रेसकडे येतील. अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी दिलीये.. काँग्रेसच्या या जिल्ह्यातील संघटना सत्यस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला. याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर केला जाणार आहे.

अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्हयातील भोकर मतदारसंघात त्या गाव भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे कामनगावमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. 





Source link

कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू

कल्याण-नगर हायवेवर भीषण अपघात! अत्यंस्कारावरुन परतणाऱ्या 5 जणांचा मृत्यू



Kalyan Ahmadnagar Highway Accident: महाराष्ट्रातील कल्याण आणि अहमदनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर आज सकाळच्या सुमार भीषण अपघात झाला.



Source link

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?

VidhanSabha Election : मुंबईत ठाकरे गट 'मोठा भाऊ'? मुंबईत हव्यात 36 पैकी 25 जागा?


Mumbai VidhanSabha Election : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. खास करून मुंबईमध्ये लोकसभेला 3 खासदार निवडून आल्यानं आता ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचं पाहायला मिळतंय. राज्यभरातील जागांची चाचपणी ठाकरेंनी सुरू केलीय. मात्र त्यांची खास नजर आहे ती मुंबईतल्या जागांवर… विधानसभेला शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. अनेक नव्या चेह-यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय. ठाकरे गट मुंबईतील कोणत्या जागांसाठी आग्रही आहेत पाहूयात …

मुंबईत ठाकरे ‘मोठा भाऊ’?

शिवडी ,भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदिवली, बोरिवली, मलबार हिल, अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर या 25 जागेवर ठाकरे गट दावा करू शकतं.

दरम्यान, ठाकरे गटानं 25 जागा मागितल्याची माहिती आपल्याकडे नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्य़े जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होईल, असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. लोकसभेला मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने 4 जागा लढवल्या, त्यापैकी 3 जागांवर विजय मिळवलाय.

लोकसभेला दमदार कामगिरी

मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत यांनी विजय मिळवला होता. तर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई यांनी बाजी मारली होती. तर मुंबई उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील विजयी झाले. एवढंच नाही तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकरांचा केवळ 48 मतांनी निसटता पराभव झाला होता.

लोकसभा निवडणुक, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसंच विधान परिषदत निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा उत्साह आहे. महाविकास आघाडीत ठाकरेंची बार्गेनिंग पावर वाढलीय. त्याचा त्यांना विधानसभेला नक्कीच फायदा होईल, असा अंदाज आहे.





Source link

पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा लॉजमधून पोलिसांच्या ताब्यात! Video भोवला

पूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा लॉजमधून पोलिसांच्या ताब्यात! Video भोवला


IAS Pooja Khedkar Mother Arrest:  महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची प्रशिक्षक प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती रद्द झाल्यानंतर आता पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुळशीमधील शेतकऱ्यांना जमीनीच्या वादातून हातात पिस्तुल घेऊन धमकावल्याप्रकरणी पौड पोलिसांना रायगडमधून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. महाड येथील हिरकणी वाडीमधील पार्वती हॉटेल (लॉज) मधून पहाटे पुणे ग्रामीण एससीबी पोलिसांनी मनोरमा यांना ताब्यात घेतले आहे.

पूजा खेडकर यांच्या आई कशा चर्चेत आल्या?

आपल्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. लाल दिव्याबरोबरच प्रशिक्षणार्थी असताना कार, स्वयीक सहाय्यकाबरोबरच वेगळ्या केबिनसाठी मागणी केल्याचे पूजा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीबरोबरचे व्हॉट्सअप चॅट समोर आले. त्यातच दिव्यांग म्हणून मिळालेलं प्रमाणपत्रही वादात सापडलं. तसेच वडिलांची संपत्ती 40 कोटींहून अधिक असताना पूजा यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासारखे प्रश्न उपस्थित करण्यात आले. असं असतानाच कारवाईसाठी पूजा यांच्या पुण्यातील घरी पोहोचलेल्या पोलिस आणि अधिकाऱ्यांचं वार्तांकन करायला गेलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींबरोबर पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी उद्धट वागणूक दिल्याने त्या सुद्धा चर्चेत आल्या. मनोरमा या चर्चेत आल्यानंतर त्याचा एक जुना व्हिडीओ समोर आला. 

काय आहे व्हिडीओमध्ये?

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ आठवड्याभरापूर्वी समोर आला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर हातात रिव्हॉल्वर आणि सोबत बाउन्सर घेऊन जमिनीसाठी वाद घालत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा एका शेतकरी कुटुंबाला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा हा व्हिडीओ असल्याचं समजतं. हा संपूर्ण प्रकार 2023 साली 5 जून रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या बाऊन्सर आणि हातात पिस्तूल घेऊन शेतक-यासोबत वाद घालताना स्पष्टपणे दिसतंय.

मनोरमा खेडकर यात काय म्हणाल्या?

“जागा माझ्या नावावर आहे. मूळ मालक मी आहे. सातबारा माझ्या नावावर आहे. मला आधी कोर्टाचा कागद आणून दाखवायचा,” असं मनोरमा हातात पिस्तूल घेऊन वाद घालताना म्हणत आहेत. “मी कोर्टात येणार, काय व्हायचं ते होऊ दे,” असं मनोरमा म्हणताना दिसत आहेत. व्हिडीओ शूट करणारा शेतकऱ्यांबरोबरची व्यक्ती, ‘मॅडम आपलं कायदेशीर सुरु आहे. तुम्ही आम्हाला का त्रास देताय?’ असं विचारतो. त्यावर मनोरमा, “तुम्ही मला कायद्याचं सांगू नका. कायद्याने मला सांगितलेलं नाही की तुम्ही करु नका म्हणून,” असं उत्तर देताना दिसतात. त्यानंतर बराच वेळ हा वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी नोटीस

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सदर शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेत पुणे पोलिसांनी मनोरमा यांना चौकशीसंदर्भात पूर्व तयारी केली होती. त्यांना अन्य एका प्रकरणात नोटीस देण्यात आल्यानंतर त्या पती दिलीप खेडकर यांच्याबरोबर पळून गेल्या.





Source link

Ladka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!

Ladka Bhau Yojana : 'लाडका भाऊ' होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!


Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : राज्यात सध्या चर्चा होतीये ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची… मात्र, लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना आणून राज्यातील तरुणांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केलीय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचे नाव आहे. या योजनेनुसार, बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, या योजनेच्या माध्यमातून सरकारने गाजर दाखवलंय, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे ही योजना नक्की आहे तरी काय? चला पाहुया…

मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना

राज्यातील बेरोजगार तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश तरुण व्यक्तींची रोजगारक्षमता आणि कौशल्य वाढवणे, त्यांना स्पर्धात्मक नोकरीसाठी तयार करणं आहे. व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांची रोजगारक्षमता वाढवणे, हे या योजनेचं उद्दिष्ठ आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षसह कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाद्वारे ही योजना राबविली जाईल. 

योजनेसाठी पात्रता निकष काय?

योजनेचा लाभ घेणारा उमेदवार18 ते 35 वयोगटातील असावा. 12 वी पास / ITI/ डिप्लोमा / ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन यांपैकी शिक्षण पूर्ण केलेलं असावं. तसेच उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, असे निकष ठेवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिप ही सहा महिन्यांची असेल. इंटर्नला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT) स्वरूपात मासिक स्टायपेंड मिळणार आहे. यालाच लाडका भाऊ योजना म्हटलं गेलं आहे. यानुसार 12 वी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळतील.

दरम्यान, ही योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केलीय. तर सरकारनं बेरोजगारांची थट्टा चालवलीय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. शरद पवारांनीही या योजनेवरून सरकारची फिरकी घेतली. सरकारला बहीण-भावाची आठवण झाली ही चांगली गोष्ट आहे. मात्र राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार कऱणंही गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.





Source link

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा



Eknath shinde Scheme for Youth : लाडका भाऊ योजनेमुळे बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp